विनायक जितकर
डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विभागामधून २०१९ साली बी. आर्क. डिग्री संपादन
डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विभागाची माजी विद्यार्थिनी आर्की. मैत्रेयी अमर पाटील हिला इंटरनॅशनल इंटिरियर डिझाईन असोसिएशन जॉर्जिया यांच्या ‘स्टुडन्ट कॉम्पिटिशन इन डिझाईन फॉर सस्टेनेबिलिटी’ या विषयात ‘स्टुडन्ट स्कॉलरशिप अवॉर्ड’ मिळाले आहे.
आर्की. मैत्रेयी सध्या SCAD युनिव्हर्सिटी अटलांटा येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिने डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विभागामधून २०१९ साली बी. आर्क. डिग्री संपादन केली आहे. “एड्रेसिंग हाय रेट ऑफ स्ट्रीट क्राईम ऑफ मिशिगन इन यूएसए” या प्रकल्पासाठी सोशल रिलेव्हन्स श्रेणीमध्ये देखील तिला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले आहे. आर्की. मैत्रेयी हि आर्की. अमर पाटील यांची मुलगी असून आर्की. अमर पाटील हेही डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विभागाचे पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत.
कोल्हापुरातील हा VIDEO नक्की पहा, तुम्ही ही पहायला जावा , लिंक ला क्लीक करा, म्हणूनच येथे होणार 31मे पर्यन्त गर्दी
या यशाबद्दल मैत्रेयीचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, आर्किटेक्चर विभागप्रमुख प्रा. आय. एस. जाधव, सर्व प्राध्यापक वर्ग व समाजाच्या सर्व स्तरातर्फे अभिनंदन होत आहे.