विनायक जितकर
रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून राजे बँकेच्या आणखीन नवीन पाच शाखांना मंजुरी मिळवून दिल्याबद्दल नामदार भागवत कराड यांचा सत्कार
राजे विक्रमसिंह घाटगे को- ऑप. बँक, कागल च्या मुरगुड (ता. कागल) येथे नूतन दहाव्या शाखेचे आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी शाहू समूहाचे प्रमुख मा. राजे समरजितसिंह घाटगे, खासदार मा. धनंजय महाडिक, खासदार मा. संजयदादा मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून राजे बँकेच्या आणखीन नवीन पाच शाखांना मंजुरी मिळवून दिल्याबद्दल नामदार भागवत कराड यांचा सत्कार शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. राजे विक्रमसिंह घाटगे को. ऑफ. बँक लि. कागल या बँकेने अल्पावधीत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत अग्रक्रमाने पोहोचवल्या आहेत. त्याचप्रमाणे ग्राहकांना तत्काळ विविध सेवा पुरवून विश्वासाहर्ता संपादन केल्याने राजे बँकेचा जनमानसात नावलौकिक वाढला असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड यांनी काढले. |
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि राजे बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू हा लहानात लहान ठेवीदार असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागामध्ये आज राजे बँक अग्रक्रमाने काम करत आहे. छोटा कर्जदार हा कधीही कर्जाचे हप्ते थकवत नाही, बुडवत नाही आणि वेळेवर हप्ते भरत असल्याने बँकाही गतिमान होतात. त्यामुळे येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्रात अनेक शाखा सुरू करण्याचा मानस राजे बँकेचा असल्याचे प्रतिपादन स्वागत व प्रास्ताविक करताना मा. राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार राजे बँकेचे अध्यक्ष मा. एम. पी. पाटील यांनी मानले. यावेळी श्रीमंत विरेंद्रसिंह घाटगे, बिद्री कारखान्याचे संचालक मा. बाबासाहेब पाटील, राजे बँकेचे उपाध्यक्ष मा. नंदकुमार माळकर, मुख्य कार्यकारी संचालक मा. विनायक चव्हाण, सर्व संचालक मंडळ, बँकेचे एच. आर. मा. हरिदास भोसले, विविध पदाधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.