WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘रिड्युस्ड ग्राफीन’ला पेटंट…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

ऊर्जा साठवणीच्या नावीन्यपूर्ण पद्धतीचे संशोधन…

कसबा बावडा – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील विद्यार्थ्यानी तयार केलेल्या ऊर्जा साठवण्यासाठी प्रथमच उपयोगात येणाऱ्या नावीन्यपूर्ण ‘रिड्युस्ड ग्राफीन ऑक्साईड/डिस्प्रोसियम सेलेनाइड कांम्पोझिट फिल्म्स’ बनविण्याच्या सोप्या आणि कमी खर्चिक ‘सिलार’ या रासायनिक पद्धतीसाठी पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे २२ वें पेटंट आहे.

जगामध्ये नवनवीन तंत्रज्ञाने मोठ्या प्रमाणात विकसित होत असून त्याची मागणी वाढतच आहे. त्यामुळे ऊर्जा साठवण्याची पद्धतीवर संशोधन महत्वपूर्ण बनले आहे. याचाच एक भाग म्हणून रिसर्च डायरेक्टर व अप्लाईड फिजिक्स या विषयामध्ये नामांकित संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात १० वर्षापासुन ऊर्जा साठवणीच्या पद्धतीवर सातत्याने संशोधन सुरु आहे.

संशोधकांनी भारत सरकारच्या पेटंट प्रमाणपत्र कार्यालयात सन २०२२ मध्ये संशोधित आणि प्रमाणित केलेल्या या ‘सिलार’ पद्धतीसाठी पेटंट मिळवण्याबाबत अर्ज सादर केला होता. १३ महिन्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांती हे पेटंट २९ मे २०२३ रोजी संशोधकांच्या नावे मंजूर केले गेले. या शोधाअंतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्ण ऊर्जा साठवणुकीची पद्धत पुढील २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केली जाईल.

या संदर्भात मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे म्हणाले, विकसित टेक्नॉलॉजीची वाढती मागणी बघता, भारतातील युवा संशोधकांनी नवनवीन पदार्थांपासून चांगल्या प्रतीचे व उच्च दर्जाचे ऊर्जा साठवणे साधने कशी तयार करता येतील यावरती भर द्यावा. भारतीय इले्ट्रॉनिक व टेलिकम्युनीकेशन बाजारपेठेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी हातभार लावावा व देशाची आर्थिक स्थिती सक्षम करावी. सदर शोध पद्धतीद्वारे तयार केलेल्या पातळ फिती या ऊर्जा साठवणुकीसाठी बनवल्या जाणाऱ्या विद्युत घट तसेच सुपरकपॅसिटर मध्ये अत्यंत प्रभावी व कार्यक्षम आहेत.

या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी संभाजी खोत, डॉ. धनाजी माळवेकर, डॉ. प्रिती बागवडे आणि रणजित निकम यांचा सहभाग होता. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.