आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिनाच्या निमित्ताने भवानी मंडपातील ऐतिहासिक क्रीडा स्तंभापासून क्रीडा ज्योत…
कोल्हापूर – ॲम्युचर कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्र आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिनाच्या निमित्ताने भवानी मंडपातील ऐतिहासिक क्रीडा स्तंभापासून क्रीडा ज्योत काढण्यात आली. या ज्योतीची सुरुवात ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते करण्यात आली.
शहरातील प्रमुख मार्गाने फिरून ही क्रीडा ज्योत शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आणण्यात आली. त्या ठिकाणी बाल स्केटिंग पटूनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तीन ते वीस वर्षाच्या 45 मुला-मुलींनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम (राज्य स्केटिंग संघटना उपाध्यक्ष) संदीप पवार, तेजस्विनी कदम, कृष्णा पाटील, ॲड.धनश्री कदम, भास्कर कदम, धनंजय पोलादे यांनी केले.
Have a pleasure international olympic day For you & yours friend Gather your friends & family & celebrate this day with great spirit & Fun The key is not then will… Everybody has that… It is the will to prepare to win that is important… Failure i can live with Not trying is what i can’t handle – saniya richard हे अश्या प्रकारचे फलक मुलांच्या हाती दिसत होते.