विनायक जितकर
डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड…
कोल्हापूर – कदमवाडी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५१ विद्यार्थ्याची नामांकित हॉस्पिटलमध्ये निवड झाली आहे. कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे हि निवड करण्यात आली आहे. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या जनरल नर्सिंग, मिडवायफरी, बी.एस.सी.नर्सिंग, पोस्ट बेसिक बी. एस. सी. नर्सिंग व एम. एस. सी. नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस ड्राईव्हमध्ये सहभाग दर्शविला.
यामध्ये पुणे येथील ज्यूपिटर हॉस्पिटल मार्फत ज्योती घोडके, पूजा बरागडे, सोनाली तेव्रत्ती, अनिकेत हेळवे, धनराज पेठकर यांच्यासह २३ विद्यार्थ्यांना तत्काळ जॉब ऑफर लेटर देण्यात आले आहेत. तर कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये १३ व अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये १५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. सुचित्राराणी राठोड, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अमोस तळसंदेकर व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना स्कील डेव्हलपमेंटसह विविध ट्रेनिंग दिली जातात. व्यक्तिमत्व विकासावरही विशेष भर दिला जातो. याचा चांगला फायदा प्लेसमेंटसाठी झाला. |
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.