तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
Maharashtra ISIS Module Case | देशविघातक कृत्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) आणि विविध राष्ट्रीय तपास संस्थांकडून कारवाई केली जात आहे. आता आणखी एक मोठी कारवाई पुण्यात करण्यात आली आहे. ISIS महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात (Maharashtra ISIS Module Case) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए National Investigation Agency (NIA) ने गुरुवारी पुण्यातील कोंढवा (Kondhwa in Pune) परिसरातून एकाला अटक (Arrest) केली आहे.
आरोपीने इस्लामिक स्टेट (IS)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट
(ISIL)/ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया
(ISIS)/Daish/ISlamic State in Khorasan सारख्या वेगवेगळ्या नावाने
ओळखल्या जाणाऱ्या ISIS च्या दहशदवादी कारवायांमध्ये मदत केल्याचे समोर आले आहे.
एनआयएच्या तपासानुसार, आरोपी अदनानली सरकार भारत सरकार विरोधात
(Government of India) दहशतवादी कृत्य करण्यासाठी विविध दहशतवादी संघटनांना मदत करत होता.
पुणे शहरातील कोंढवा परिसरात एनआयए ने छापा टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईत डॉ. अदनानली सरकार Dr Adnanali Sarkar (वय-43) याला अटक केली आहे. एनआयएने सरकार याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स (Electronic Gadgets) आणि ISIS शी संबंधित अनेक दस्तावेज जप्त (Documents) केले आहेत. हा आरोपी तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी (Terrorist Activities) भरती करत होता, अशी माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. (Maharashtra ISIS Module Case)
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.