| KOLHAPUR दोन वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आले आहे. ही कारवाई पाेलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे रविंद्र कळमकर यांच्या नेेतृत्वाखाली पथकाने केली. पाेलिसांना हवे असलेले रेकाँर्डवरील गुन्हेगार शाेधण्याची माेहीम पाेलिसांनी हाती घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
सचिन सदाशिव कुडाळकर,( रा. फुलेवाडी रिंगरोड कोल्हापूर) यांनी याबाबत तक्रार दिली हाेती. फरारी आरोपी रंगराव पाटील, (रा. वहणगे, ता. करवीर) याने फ्लॅट देतो असे सांगून प्रत्येकांना दोन बँकेतील कर्ज मंजूर करून देवून सदरची रक्कम स्वतःकडे घेतली, परंतू फ्लॅटधारकांना फ्लॅट ताब्यात मिळाले नाहीत. फ्लॅटधारकांचे नांवावर बँकेचे कर्ज असलेने बँकेनी कर्जाकरीता फ्लॅटधारकांकडे तगादा लावला होता. त्यामुळे सर्व कर्जदार हे हैराण झाले होते. म्हणून सर्व फ्लॅटधारकांनी आरोपी रंगराव पाटील याचे विरुध्द करवीर पोलीस ठाणे येथे तक्रार देत, आराेपीने 1,56,70,000/- रु.ची फसवणूक कैलेबाबत म्हटले आहे. सह महाराष्ट्र रियल इस्टेट रिजर्व्हेशन अॅक्ट 2016 चे कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. आरोपी रंगराव पाटील हा गुन्हा दाखल झालेपासून फरारी हाेता. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी रंगराव पाटील याचेबाबत कायेदशीर प्रक्रिया करून त्यास न्यायालयाकडून फरार घोषीत केले हाेते.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
आरोपीने फिर्यादी गायत्री ध्रुव जाधव, (रा. रामानंदगर कोल्हापूर) यांचे 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागीने गहाणवट घेवून ते त्याचे मित्राकडे ठेवले. फिर्यादीनी सदर दागीन्यांची मुद्दल व व्याज फिर्यादी यांचे मित्रांना परत केली परंतु आरोपी रंगराव पाटील यांनी 10 तोळे सोन्याचे दागीने परत केले नाहीत म्हणून त्याचेविरुद्ध शाहुपूरी पोलीस ठाणे येथे फसवणूकीचा गुन्हा दाखल असल्याने या गुन्हयात देखील तो मिळुन येत नव्हता. आरोपी रंगराव पाटील हा पोलीसांची कारवाई चुकविणेकरीता त्याचे वडणगे येथील घरी न राहता बाहेरगांवी राहत होता. तो वारंवार राहणेची ठिकाणे बदलत होता. त्यामुळे तो मिळुन येत नव्हता. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या पथकाला आरोपी हा रुकडी गांवचे परिसरात राहत असलेल्याची पक्की माहिती प्राप्त झाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, वैभव जाधव, रुपेश माने, युवराज पाटील, अमित सर्ज व संजय पडवळ यांनी रुकडी तब्बल 07 दिवस सापळा रचला.पथकाने दिवसरात्र डाेळ्यात तेल घालून पहारा करत, मुक्काम ठाेकला नि अखेर रंगराव आनंदराव पाटील, (वय 48, रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यास अखेर शिताफीने ताब्यात घेतला. आरोपी रंगराव पाटील याचे विरुद्ध करवीर पोलीस ठाणे व शाहुपूरी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असून त्यास पुढील कारवाईकरीता आर्थिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्या ताब्यात दिले आहे. |
![]() |
|
दोन वेगवेगळ्या घटनांमधील आरोपी अटकेत कोल्हापूर : दोन वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमधील आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि पोलिसांना यश आले आहे. पहिल्या घटनेत दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले तर दुसऱ्या घटनेत विदेशी दारूची अनधिकृत वाहतूक करणाऱ्या टेम्पोला चालकासह अटक केली आहे. याप्रकरणी ५,७६,०००/- रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. |
![]() |
| ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, स.पो.नि. चेतन मसुटगे, पोलीस अंमलवार गजानन गुरव, संतोष बरगे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, योगेश गोसावी, प्रविण पाटील, प्रदिप पाटील, विशाल खराडे व महेंद्र कोरवी जुना राजवाडा पोलीस ठाणेचे प्रशांत घोलप, अमर पाटील, सागर डोंगरे व संदिप माने यांनी केलेली आहे. |
![]() |
LCB- तब्बल सात दिवस मुक्काम ठाेकला… नि फरारीला पकडला
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375




































































