***LCB ची मोठी कारवाई
कोल्हापूर मध्ये खळबळ, चोरट्यांना जोर का झटका
***दुचाकी व चारचाकी चोरणारी 5 जणांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद, आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता
एकूण 60,00,000/- रूपये किंमतीच्या 07 चारचाकी व 05 दुचाकी जप्त. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाची दमदार कारवाई. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित व अप्पर पोलीस अधीक्षक निखिल खाटमोडे यांच्या मार्गदशनखाली केली कारवाई,
![]() |
![]() |
![]() |
![]() |
या कारवाईत गाड्या चोरणारी टोळी अटक केली असून,
कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी जाणाऱ्या रोडवर जलसंपदा कार्यालयाच्या गेटजवळ सापळा रचून एकूण ६०,००,०००/- रुपये किमतीच्या ०७ चारचाकी व ०५ दुचाकी हस्तगत केल्या. याप्रकरणी नागेश हनुमंत शिंदे, करीम शरीफ शेख, मोहम्मद मुस्तफा सुफी, इमामसाहब रसूलसाहब मुलनवार, संतोष बापू देटके या पाच जणांना ताब्यात घेतले. यांच्या कडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
चोरी केलेल्या गाड्याची यादी पहा
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेत्रे रामचंद्र कोळी सुरेश पाटील महेश खोत रुपेश माने रोहित मर्दानी विनोद कांबळे संजय पडवळ अमित सरजी संजय कुंभार सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर तसेच सायबर पोलीस ठाणे कडील सचिन बेंडखेळे सुरेश बाबर व महिला पोलीस अंमलदार मीनाक्षी पाटील सहभागी होते.