![]() |
||
|
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत कोल्हापूर, सांगलीत ८ हजार अर्ज लाभ असा घ्या. https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करा. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲप कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ८ हजार १७ घरगुती ग्राहकांनी अर्ज दाखल केले आहेत. या योजनेतून अद्यापपर्यंत १२०६ घरगुती ग्राहकांनी ४३३९ किलोवॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले आहेत. या योजनेतून तीन किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा घरगुती ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे. घराच्या छतावर सौरप्रकल्प बसवून वीजनिर्मिती करायची व त्याद्वारे घराची विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. वापराइतकी सौर वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते. अधिकची निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. ![]() प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सौर प्रकल्पासाठी २ किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रती किलोवॅटला ३० हजार रुपये तर तिसऱ्या किलोवॅटला १८ हजार रुपये अनुदान मिळेल. अर्थात १ किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व ३ किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून थेट मिळेल. दि.१३ फेब्रुवारी २०२४ नंतर अर्ज दाखल केलेल्या ग्राहकांना केंद्र शासनाकडून नव्या दराने अनुदान मिळेल. १ किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाद्वारे वार्षिक सरासरीने मासिक सुमारे १२० युनिट वीज निर्मिती होते. मासिक १५० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या कुटुंबाला २ किलोवॅट तर मासिक १५० ते ३०० युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी ३ किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा पुरेशी ठरते.कोल्हापूर जिल्ह्यात ४७४७ घरगुती ग्राहकांनी अर्ज दाखल केले असून ९४८ ग्राहकांनी योजनेतून ३४४४ किलोवॅट सौर यंत्रणा बसविली आहे. जिल्ह्यात १ लक्ष ७१ हजार कुटुंबाचे लक्ष्य निर्धारीत आहे.सांगली जिल्ह्यात ३२७० घरगुती ग्राहकांनी अर्ज दाखल केले असून २५८ ग्राहकांनी योजनेतून ८९५ किलोवॅट सौर यंत्रणा बसविली आहे. जिल्ह्यात १ लक्ष१४ हजार कुटुंबाचे लक्ष्य निर्धारीत आहे.
|
||
![]() |
सूर्यघरासाठी नागरिकांची गर्दी…. सांगली, काेल्हापूरात प्रतिसाद- ८ हजार अर्ज दाखल
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.















































































