(जी. जी. पाटील शिराळा)
शिबिरामध्ये दहावी व बारावी विद्यार्थी कौशल्य आत्मसात तांत्रिक शिक्षण
शिराळा – शिराळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.
या शिबिरामध्ये दहावी व बारावी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करून तांत्रिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहावे असे मत शिराळा विधानसभा सदस्य आमदार मानसिंग भाऊ नाईक यांनी व्यक्त केले. ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर शिबिराची प्रमुख अतिथी संस्था व्यवस्थापन समिती आयटीआय शिराळा चे अध्यक्ष दादासाहेब पाटील होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री एस. आय. भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
हर्षल पाटील चीफ ऑपरेटिंग नेत्रा आरआयटी इंक्युबेशन सेंटर, इस्लामपूर, श्रीमती निशा पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जिल्हा सांगली, ऋषिकेश जाधव जिल्हा कौशल्य विकास समन्वय सांगली, प्रवीण बनकर यंग प्रोफेशनल सांगली यांनी करिअर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एन ए पांढरे व एबी लोहार यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्ही एस पाटील यांनी मांडले.