विनायक जितकर
आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश…
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प पुर्नबांधणीसाठी 41 कोटी 64 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर कामाचा शुभारंभ खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थित व मेघोली पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटून मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरुळ, सोनुर्ली, ममदापूर आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या बरोबरच नागरीकांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सदर प्रकल्प पुर्नबांधणीसाठी सातत्याने प्रयत्न करुन मेघोली धरणाच्या पुनर्बांधणीसाठी मुखमंत्री नाम. एकनाथजी शिंदे यांच्याकडून 41 कोटी 64 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला असून या परिसरातील गावांची तहान भागवण्याबरोबर परिसरातील शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी कठीबध्द आहे.
यावेळी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, राहूरी कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले, बिद्रीचे माजी संचालक नंदकुमार सूर्यवंशी, सुर्याजीराव देसाई, तहसीलदार अश्विनी वरुटे, जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळासाहेब अजगेकर, पाटबंधारे कार्यकारी अभियंता स्मिता माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर, बाजार समितीचे संचालक संदीप वरंडेकर, माजी सभापती किर्तीताई देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख संग्राम सावंत, विजयराव बलुगडे, जयवंतराव चोरगे, बाळासाहेब भोपळे, तालुका संघाचे संचालक मानसिंग पाटील, धैर्यशील भोसले-सरकार, वेंगरूळचे सरपंच प्रशांत देसाई, मेघोली सरपंच सुनीता राऊळ, उपसरपंच संजय देसाई, तुकाराम देसाई, सचिन राऊळ, सागर राऊळ, कुंडलिक तळकर यांच्यासह मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरुळ, सोनुर्ली, ममदापूर आदी गावातील शेतकरी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.