धर्मादाय आयुक्त च्या कार्यशाळेला विश्वस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
धर्मादाय आयुक्त च्या कार्यशाळेला विश्वस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Kolhaour: कोल्हापूर :शेखर धोंगडे
महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसीय कृती आराखड्याच्या अनुषंगाने आणि  धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच धर्मादाय सह आयुक्त श्रीमती निवेदिता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, कोल्हापूर व कोल्हापूर रिजन ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वस्तांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला विश्वस्तांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी चर्चासत्र आणि विविध विषयांवर ती मार्गदर्शन करण्यात आले.
ही कार्यशाळा खासदार बाळासाहेब माने चॅरिटेबल ट्रस्ट, जयसिंगपूर यांच्या वतीने गुरुवारी पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मादाय उप आयुक्त श्रीमती कां. रा. सुपाते-जाधव होत्या. कार्यशाळेस २५० हून अधिक विश्वस्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  बाळासाहेब भांदिगरे यांनी केले. यावेळी ॲड. डी. एस. पाटील, ॲड. अमित बाडकर, ॲड. व्ही. जी. सरदेसाई, ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. समृध्दी माने, ॲड. विराज कदम, ॲड. शिवतेज शिंदे आणि कार्यालयाचे अधीक्षक डॉ. विशाल क्षीरसागर यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील विविध तरतुदींबाबत मार्गदर्शन केले.
धर्मादाय उप आयुक्त श्रीमती सुपाते-जाधव यांनी आपल्या भाषणात, विश्वस्तांनी त्यांच्या घटनेचे/योजनेचे बारकाईने पालन करून कार्य केल्यास वाद टाळता येतील व कोणत्याही कारवाईची वेळ येणार नाही, असे सांगितले. तसेच, उपस्थित विश्वस्तांनी मांडलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या कार्यशाळेत धर्मादाय कार्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली आणि विश्वस्तांनी नवीन कायदेशीर सुधारणा तसेच उपलब्ध सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.