विद्यार्थ्यांचे अद्भुत मानसिक कौशल्य! ‘ब्रेन बूस्टर’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चिपळूण-पेढेपरशुराम (रविना पवार): भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयात ‘ब्रेन बूस्टर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जीवन विकास सेवा संघ आणि ओतारी आई चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अद्भुत मानसिक क्षमतांचे प्रभावी प्रदर्शन घडवले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी डोळे झाकून विविध वस्तू अचूक ओळखण्याचे विलक्षण कौशल्य सादर केले. ओळखपत्रे, कार्टून पात्रे, चलनी नोटा आणि त्यांचे क्रमांक केवळ स्पर्शाच्या आधारे ओळखून त्यांनी उपस्थित प्रेक्षकांना अचंबित केले. हा प्रयोग मुलांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ करणारा ठरला असून, स्मरणशक्ती आणि एकाग्रता विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतो, असे मार्गदर्शन करत मानसशास्त्र तज्ञ दीपक माळकरी सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
या प्रयोगात सहभागी विद्यार्थी: सोनाक्षी, सुप्रिया, शिवम, श्रेया यादव. यांनी आपल्या ब्रेनबूस्टर बुद्धीचे कौशल्य प्रदर्शन करून उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांचे मन जिंकले.
या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापिका संगीता ओतारी मॅडम, आरोग्य विभागाच्या सौ. पूजा पुजारी महिला सक्षमीकरणाचे अध्यक्ष मंदार पुजारी यांची महत्त्वाची भूमिका राहिली. तसेच आर. सी. काळे विद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचारी, जसे की – मुरसिदधा पडवळे , सुधीर सावर्डेकर , नितेश गमरे विशाखा माळी उज्वला दवंडे , नितीन रेपाळ विजय आयरे संदेश पवार दीप्ती सुर्वे आणि स्वरूपा कदम – यांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रेरणादायी स्पर्श दिला.
‘ब्रेन बूस्टर’ कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण केली असून, त्यांची मानसिक क्षमता विकसित करण्यासाठी याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.