कोल्हापूर दौऱ्याच्या पाश्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
कोल्हापूर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवार दि. ५ एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून हा दौरा यशश्वी करण्याचा निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. येथील शासकीय विश्रामधाम येथे दुपारी जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व तालुका प्रमुख, इतर पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक पर पडली.
यावेळी जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सरवडे येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास किमान पंचवीस हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती कदम यांनी दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांचा दौरा यशश्वी करून दाखविण्याची जबाबदारी सर्वच शिवसैनिकांची आहे. विमानतळ येथे पदाधिकाऱ्यांनी स्वागतासाठी यायचे आहे. त्यानंतर राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील मेळाव्यास शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक विजय बलुगडे यांनी केले. या बैठकीस भुदरगड तालुकाप्रमुख संग्राम सावंत, कागल तालुकाप्रमुख सुधीर पाटोळे, गडहिंग्लज तालुकाप्रमुख संजय संकपाळ, गगनबावडा तालुकाप्रमुख कृष्णा पवार, करवीर तालुकाप्रमुख अरूण पाटील, गारगोटी शहरप्रमुख रणधीर शिंदे कल्लाप्पा नवगिरे चंदगड तालुका प्रमुख संजय पाटील आजरा तालुकाप्रमुख अजित पाटील उपजिल्हाप्रमुख कोल्हापूर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.