श्री. नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर : श्रीमंत मधुरिमाराजे छत्रपती, पद्मश्री डी. वाय. पाटील ग्रुपचे संजय डी. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, डॉ. प्रतीक राऊत, सुरेश पिसाळ, राजेश लाटकर, अर्जुन माने, विनायक फाळके, हर्षल सुर्वे, गोशिमाचे अध्यक्ष दीपक चोरगे, संदीप सरनाईक, माणिक मंडलिक, डॉ. बाबासाहेब उलपे, उदय पवार, जय जाधव, विजय जाधव, आशिष पवार, ओंकार जाधव, दिपक थोरात, किरण अतिग्रे, रोहन शिंदे, निवेदक विजय साळुंखे यांच्यासह मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.संयोजन राजू साळोखे, प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, अमित शिंत्रे, नंदू साळोखे, योगेश सुतार, सागर शिंदे, राजेंद्र ठोंबरे, विजय जाधव, सागर येवलुजे, अनिल साळुंखे, शिरीष पाटील, आकाश शिंदे, अमोल गायकवाड, ओंकार जाधव, श्रीनिवास जाधव, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, संभाजी मांगुरे पाटील, अमर फाळके यांनी केले.
उद्घाटनाचा सामना फुलेवाडी फुटबॉल क्लब आणि बीजीएम स्पोर्टस यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात फुलेवाडी क्लबने ३-० गोलने विजय मिळवला. या सामन्यात संदीप पवार यांना सामनाविरचा पुरस्कार देण्यात आला.स्पर्धेतील पहिला सामना सम्राट नगर फुटबॉल क्लब व संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यामध्ये खेळायला गेला. या सामन्यात जुना बुधवार पेठ संघाने ३-० गोलने विजय मिळवला. जुना बुधवार पेठ संघाच्या अभिषेक भोपळेला सामनाविरचा पुरस्कार देण्यात आला. अभिषेक भोपने स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली.