WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

GOOD NEWS दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातिवंत, दुधाळ व सशक्त म्हैशी मिळणार.– अरुण डोंगळे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

म्हैस विक्री केंद्रामध्ये जातिवंत, दुधाळ व निरोगी म्हैशी उपलब्ध–‘गोकुळ’च्या जातिवंत म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन संपन्न

कोल्हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा,जाफराबादी म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन व दूध उत्पादकास म्हैस प्रदान कार्यक्रम गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळ, एन.डी.डी.बी.चे प्रतिनिधी, प्राथमिक दूध संस्‍थांचे प्रतिनिधी, गोकुळचे अधिकारी यांच्‍या उपस्थितीत केर्ली ता. करवीर येथे संपन्‍न झाला.

गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळ ने सर्वसामान्य दूध उत्पादक केंद्र बिंदू मानून नेहमीच दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळमार्फत सातत्याने दूध उत्पादकांना किफायतशीर दूध व्यवसाय करण्यासाठी विविध सेवा सुविधा पुरवल्या जातात. एन.डी.डी.बी व गोकुळ यांनी संयुक्तपणे उभे केलेल्या या जातिवंत म्हैस विक्री केंद्रामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातिवंत, दुधाळ व सशक्त म्हैशी उपलब्ध होणार आहे. यामुळे म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी निश्चितच चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी संघ नियमानुसार आपल्या पसंतीनुसार स्व:जबाबदारीने दुधाची खात्री करूनच या केंद्रातून म्हैशी खरेदी कराव्यात व उत्तम व्यवस्थापनाद्वारे त्यांचे संगोपन करावे असे आवाहन केले. या म्हैस विक्री केंद्रावरती खरेदी केलेल्या म्हैशींना संघ नियमानुसार गोकुळमार्फत ३० हजार रुपये अनुदान मिळणार असून त्यापैकी आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये अनुदान प्रस्ताव सादर केलेनंतर तात्काळ देण्याचे यावेळी जाहीर केले. तसेच भविष्यात या जातिवंत म्हैस विक्री केंद्राला दूध उत्पादकांनाच्याकडून मिळणारा प्रतिसाद पाहून दूध उत्‍पादन वाढीस चालना मिळण्यासाठी जिल्ह्यातील भौगोलिक स्थितीचा विचार करून इतर ठिकाणी हि अशी जातिवंत म्हैस विक्री केंद्रे सुरु करण्यात येतील असे सांगितले.

यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघ व एन.डी.डी.बी. यांच्या संयुक्त विद्यमाने उभा केलेल्या या जातिवंत म्हैस विक्री केंद्रामुळे गोकुळच्या दूध उत्पादकांना परराज्यातील जनावरे खरेदीसाठी येणाऱ्या अडीअडचणी कमी होणार असून खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे तरी याचा लाभ दूध उत्पादकांनी घ्यावा असे सांगितले.या कार्यक्रमावेळी नवीन म्हैस विक्री केंद्रातून म्हैस खरेदी केलेल्या दूध उत्पादक राणी कोंडीराम पोवार, प्रतिमा दूध संस्था – निटवडे, बाबासो केरबा दिवसे, नागनाथ दूध संस्था- नागदेववाडी, बळीराम पांडुरंग साळोखे, पंचगंगा दूध संस्था – आंबेवाडी, नवनाथ केरबा गुडाळे, जखनाई दूध संस्था – राशिवडे बु।।, हरीश भिकाजी दळवी, धरमीमाई दूध संस्था गवसे पैकी पाटीलवाडी, बाबू व्यंकू कागणकर, विठ्ठल दूध संस्था – तावरेवाडी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी स्‍वागत प्रास्ताविक संचालक बाबासाहेब चौगले व यांनी केले. तर एन.डी.डी.बी. मुंबई चे जनरल मॅनेजर डॉ. शिवकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर आभार संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी मानले.

यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील,संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, एन.डी.बी,बी.चे प्रतिनिधी डॉ.शिवकुमार पाटील, डॉ.मोहम्मद तारिक, डॉ.उदयकुमार मोगले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंखे, संघाचे अधिकारी, पंचक्रोशीत दूध संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या म्हैस विक्री केंद्रातून म्हैस खरेदी केलेल्या दूध उत्पादकास म्हैस प्रदान करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,एन.डी.बी,बी.चे प्रतिनिधी डॉ.शिवकुमार पाटील व संघाचे अधिकारी आदी दिसत आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.