कणेरी मठः उत्सुकता संपली… अवघ्या काही दिवसांवरच….लोकोत्सव देणार आशेची नवी किरणे, नव्या जीवनशैलीचा हुंकार

रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गजांचीही राहणार उपस्थिती पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला,…

राधानगरीतील जनावरांच्या बाजाराला शेतकरी व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 विजय बकरे राधानगरी येथे बंद असलेला जनावरांचा बाजार अखेर नूतन सरपंच सविता राजाराम भाटळे यांच्या पुढाकरामुळे…

पत्रव्यवहार केला पण कुणी पाहिलंच नाही… अखेर कुसळेवाडी येथील वारणा डाव्या कालव्यावरील पूल काेसळला

शिराळा (जी.जी.पाटील) शिराळा तालुक्याचा पश्चिम भागातील कुसळेवाडी येथील वारणा डाव्या कालव्यावरील पुल बुधवार दि.१५ रोजी सकाळी…

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, जास्त उत्पादन घ्या- मानसिंगराव नाईक

शिराळा (जी.जी.पाटील) रासायनिक खताच्या होणाऱ्या अतिवापरामुळे शेती दिवसेन दिवस नापीक होऊ लागली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक…

उन्हातून पायपिट करत आलेल्या शेकडो शेतकरी बांधव-भगिनी, शालेय विद्यार्थी यासह नागरिकांनी घेतला झुणका-भाकरीचा आस्वाद… निमित्त भीमा कृषी प्रदर्शन

काेल्हापूरःपश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया भीमा कृषी प्रदर्शनात सलग १५ व्या वर्षी मोफत झुणका-भाकर वाटप उपक्रम राबवण्यात…

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिल्या सूचना… नेमका जनहिताचा काय निर्णय आहे पहा

संदीप इंगळे- शिराेळ पंचगंगेतील पाणी तातडीने प्रवाहित करा प्रदूषणामुळे पंचगंगा नदी पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित…

गुळासाठी काेल्हापूर जिल्हा जगप्रसिद्ध…मात्र गुऱ्हाळग्रहांची संख्या कमी!

काेल्हापूर येथे दाेन दिवसीय प्रशिक्षण काेल्हापूरः  नाबार्ड, कोल्हापूर, प्रादेशिक गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य…

जगाच्या पाठीवर डेअरी उद्योगात भारताला सर्वाधिक संधी

दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी नियोजन आणि कालबद्ध कृती कार्यक्रम राबविण्याची गरज इंडियन डेअरी फेस्टिव्हल  २०२३ चे आयाेजन…

मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार अर्थसहाय्य.. काेण व किती कशासाठी देणार वाचा सविस्तर

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ – 15 लक्ष रु. अर्थसहाय्याच्या…

जी.जी.पाटील, शिराळा

चांदोली अभयारण्या शेजारील दहा किलोमीटर अंतरावरील शेतशिवारात वानरे ऊस,भुईमूग, पावटा इ.चा पाडतात मोर ,लांडोरी पेरलेलं धान्य व आलेले मोड उगवूच देत नाहीत. गवे उभी पिके फस्त करतात .बिबटे मानवावर व पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात. इथले उदरनिर्वाहाचे साधनच वन्याप्राण्याकडून हिरावून घेतले जात आहे.मणदूर, उखळू या गावातील कित्येक एकर शेती पिकाविना पडून आहे.त्यामुळे आम्ही जगायच कसं असा सवाल चांदोली अभयारण्या शेजारील गावे व वाड्यावस्तीवरील शेतक-यांच्यातून उपस्थित केला जात आहे. शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागातील सोनवडे, मणदूर, आरळा, मिरुखेवाडी, जाधववाडी, कोळेकरवाडी,मणदूर धनगरवाडा, खुंदलापूर, तर शाहुवाडी तालुक्यातील उखळू,शित्तूर, शिराळे,खेडे यासह वाड्यावस्तीवरील बिबट्यांचे पाळीव प्राणी तसेच मानवावरील होणारे हल्ले सध्या चिंतेचा विषय बनू लागला आहे.

वानराकडून ऊसाचा फडशा पाडला जातो,भुईमूग, पावटा,मका ही पिके शेतक-यांच्या पदरात पाडू देत नाहीत.गवे उभी पिकेच फस्त करतात.तर मोर ,लांडोरी तर पेरलेले धान्य उकरून खावून टाकतात.पेरलेले उगवूच देत नाहीत.तर बिबटे व हिंस्र वन्य प्राण्यांकडून पाळीव प्राण्यांच्या वरील हल्ल्यामुळे नुकसान होऊ लागले आहे.

या परिसरात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.त्याला जोडधंदा म्हणून शेळ्या मेंढ्या ,गाईम्हशी हे उदरनिर्वाहाचे जगण्याचे प्रमुख साधन आहे.तेच आता बिबटे व जंगली हिंस्र प्राणी हिरावून घेत आहेत. शासनाकडून ही तुटपुंजी मदत मिळत आहे. मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.तरीही शासनाचा वन्यजीव विभाग मुग गिळून गप्प का ? असा सवाल शेतक-यांच्यातून उपस्थित होत आहे.यानिमित्ताने पुन्हा एकदा अभयारण्या भोवताली कुंपनाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. शासनाच्या वन्यजीव विभागाकडून ठोस उपाययोजनां करणे आवश्यक आहे.अन्याथा येथील शेतकरी उध्वस्त होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

अभयारण्यात खाद्याची कमतरता,पर्यटनाच्या गाड्यांचा कर्कश आवाज यामुळेच जंगलातील बहुतांश प्राणी खाद्याच्या शोधासाठी मानवी वस्ती जवळपास व ऊसाच्या फडात आश्रय घेवू लागलेत.सहजच शिकार उपलब्ध होत असल्याने अभयारण्यात वन्यप्राणी दिसेना झालेत.याचा वन्यजीव विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.