करवीर तालुक्यातील उचगाव येथे खासदार महोत्सवातर्ंगत भाजप महिला आघाडी आणि भागीरथी संस्थेच्या महिला मेळावा आणि स्पर्धेला उदंड प्रतिसाद
संधी मिळाली की हम भी कुछ कम नही, हे महिला दाखवून देतात. उत्तम व्यवस्थापन कौशल्य, चिकाटी आणि संयम यांच्या बळावर शेकडो महिलांनी विविध क्षेत्रात आकाशाला गवसणी घातली आहे. कोल्हापूर जिल्हयातील प्रत्येक महिलेने आपल्या कलागुणांना आणि उद्यमशिलतेला वाव द्यावा, या हेतूने भागीरथी महिला संस्था सदैवं प्रयत्नशिल आहे, असे उद्गार सौ. अरूंधती महाडिक यांनी काढले. करवीर तालुक्यातील उचगाव इथं खासदार महोत्सवातर्ंगत भाजप महिला आघाडी आणि भागीरथी संस्थेच्या वतीने महिला मेळावा आणि विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धांना महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीने खासदार महोत्सवातर्ंगत करवीर तालुक्यातील उचगाव इथं होम मिनिस्टर आणि महिला मेळावा घेण्यात आला. सौ.अरुंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाला सुरवात झाली. यावेळी सौ. अरूंधती महाडिक यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. व्यासपीठ मिळाले तर महिला आपल्यातील सर्वोत्तम कलागुणांचे प्रदर्शन निश्चितच घडवतात. विविध क्षेत्रात गरूडझेप घेवून महिलांनी ही बाब अनेकवेळा सिध्द करून दाखवली आहे. महिलांनी विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करावी, यासाठी भागीरथी महिला संस्था सदैवं प्रयत्नशिल असल्याचे सौ. महाडिक यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील सशक्त भारत घडवण्यात महिला शक्तीचा मोठा हातभार असेल, असा विश्वासही सौ. महाडिक यांनी व्यक्त केला. यानंतर होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभागी होत महिलांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. या स्पर्धेत वैजयंती शेलार, वैष्णवी मेटकर आणि कविता हुदलीकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम विजेत्या महिलांना पैठणी भेट देण्यात आली. चतुर्थ क्रमांक विजेत्या पुजा माळी यांना गॅस शेगडी तर पाचवा क्रमांक मिळवलेल्या कविता चव्हाण आणि उत्तेजनार्थ विजेत्या अश्विनी वाईंगडे यांना मिक्सर आणि कुकर देण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या अनुराधा वाईंगडे, मयुरा चव्हाण, कल्याणी वाईंगडे यांनी मनोगत व्यक्त करताना भागीरथी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत, खासदार महोत्सवामुळं महिलांना मंच उपलब्ध झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाला संगीता दळवी, शोभा संकपाळ, प्रतिभा जाधव, वैशाली यादव, विजया कासोटे, विजयमाला देशमुख, उज्ज्वला पाटील, नंदिनी कुंभार, अर्चना माळगे, महेश चौगले, संदीप कुंभार, नामदेव वाईंगडे, दत्तात्रय तोरस्कर, राजेंद्र संकपाळ, अनिल शिंदे, उमेश पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
या महिला मेळाव्याचे काैतुक करावे तितके कमीच… महिलांची एकजूट आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम पाहण्याजाेगेच- POSITIVVE WATCH