कोल्हापुरात कोळी समाजाचा भव्य मोर्चा
अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे ही प्रमुख मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर : आदिवासी कोळी, महादेव टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार डोंगर कोळी या अनुसूचित जमातीवर जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी यांच्या अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे न देण्याच्या भूमिकेवर कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला दसरा चौकातून सुरुवात झाली व्हिनस कॉर्नर वसंत बहार रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला या मोर्चामध्ये कोळी समाजातील बांधवांनी आदिवासींची वेशभूषा केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर समाजातील मान्यवरांनी मोर्चाला संबोधित केलं यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
या बातमीला देखिल वाचकांनी पसंती दिली.., निळ्या लिंकवर क्लिक करा…
भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आणि आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये समाज विकास मंडळाचे अध्यक्ष विजय भोजे रमेश कोळी आणि राजेंद्र कोळी यांच्यासह आदिवासी कोळी समाजाच्या महिला आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आमदार पडळकर यांनी आदिवासी कोळी समाजाच्या या मागण्यासाठी राज्यभर भव्य मोर्चे काढणार असल्याचं यावेळी सांगितलं.