शिराळा (जी.जी.पाटील)
अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीबद्दल आभार; मात्र यापुढे किमान वेतन व पेन्शन साठी लढाई : अध्यक्षा सौ. अलका विभुते
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात राज्य शासनाने केलेल्या तरतुदीबद्दल सरकारचे आभारी आहोत मात्र शासनाने यापुढे अंगणवाडी सेविकांना चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा व मानधन वाढ नको तर चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी लागू करावी किमान वेतन व पेन्शन अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या शिराळा तालुका अध्यक्ष सौ. अलका विभुते यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना केली.
तसेच त्या म्हणाल्या, शासनाने केलेली मानधन वाढ जरी पुरेशी नसली तरी या सरकारने अंगणवाडी सेविका या उपेक्षित घटकांला न्याय देण्याची घेतलेली भूमिका स्वागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी मधून महिलांना 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी मान्यता दिल्याबद्दल शासनाचे आभार आहेत. आपल्या देशाचे भवितव्य म्हणून नवजात बालकाकडे पाहिले जाते, हा देशाचा आधारस्तंभ आहेत. त्यांना शारीरिक व शैक्षणिक दृष्ट्या बलदंड करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अशीच आहे. केंद्र व राज्य शासनाच्या लक्षात घेऊन या घटकाकडे लक्ष दिले आहे याबद्दल सरकारचे आभार. वास्तविक पाहता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून मान्यता देऊन त्यांना मानधन नव्हे तर वेतन करावे अशी मागणी आमची शासनाकडे आहे भविष्यात या संदर्भातील अजून लढाई बाकी आहे.