तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
राधानगरी ते दाजीपूर रस्ता वाहतुकीसाठी सुरु
कोल्हापूर, : राधानगरी ते दाजीपूर या लांबीपैकी पठाणनाला ते राधानगरी या लांबीतील डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने अधिसुचना रद्द करुन दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुर्वीप्रमाणे सुरु करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
राधानगरी ते दाजीपूर या लांबीपैकी पठाणनाला (किमी 79/400) ते राधानगरी या लांबीतील डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तथापि, दाजीपुर ते पठाणनाला या लांबीतील काम करत असताना वन विभागाकडून हरकत घेऊन या लांबीतील काम बंद करण्यात आले आहे. या विभागाकडून वनविभागाकडे परवानगी बाबत पाठपुरावा सुरु असून वनविभागाकडून परवानगी प्राप्त होताच पुनश्च रस्ता बंद करण्याबाबत परवानगी घेण्यात येत आहे. राधानगरी, दाजीपुर ते फोंडा या मार्गातील बंद करण्यात आलेली वाहतुक पुर्ववत करण्यात येत असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.