तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यामध्ये प्राणी गणनेसाठी 30 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यामध्ये दि. 5 व 6 मे 2023 रोजी बौध्द पौर्णिमेनिमित्त पाणस्थळावरील निसर्गानुभव कार्यक्रम 2023 साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पाणवठ्यावरील प्राणीगणना करण्यास इच्छुक उमेदवारांनी www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरुन आवश्यक अर्ज डाऊनलोड करुन दि. 30 एप्रिल 2023 पर्यंत www.census2023wlkop@gmail.com या संकेतस्थळावर अर्ज ई-मेल व्दारे पाठवावेत, असे आवाहन विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) जी.गुरुप्रसाद यांनी केले आहे.
एकुण 29 जणांमध्ये प्रथम पहिल्या 24 उमेदवारांची नावनोंदणी करुन घेतली जाईल व उर्वरित 5 जागा एनजीओसाठी (स्वयंसेवी संस्था) आरक्षित ठेवल्या जातील. दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत एनजीओच्या (स्वयंसेवी संस्था) जागा रिक्त राहिल्यास खुल्या जागा भरण्यात येतील. 29 जागा भरल्यानंतर येणाऱ्या उमेदवारांची नोंदणी करण्यात येणार नाही, असेही वनअधिकारी जी. गुरुप्रसाद यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.