‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर ः
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्यावतीने शुक्रवार दि. 20 सप्टेंबर रोजी ‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अध्यासनाच्या इमारतीत सकाळी साडेदहा वाजता कार्यशाळेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल.
कार्यशाळेत नवी दिल्ली येथील झी इंटरनॅनशलच्या विओन या क्रीडा वृत्तवाहिनीचे क्रीडा विश्लेषक आदित्य पिंपळे आणि सोलापूर येथील एबी न्यूजचे संपादक गणेश गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी https://forms.gle/uWstf6UPSjs9TSmc6 या लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.