|
कोल्हापूर : जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्रातील 434 आयटीआय संस्थांमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांच्या हस्ते मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे पार पडले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे प्रधान सचिव गणेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
मॅकचे संस्थापक, संचालक संजय पेंडसे यांनी मनोगतामध्ये संविधानाप्रती आदर करणे म्हणजे जी साधने आपल्या अवतीभोवती आहेत त्यांची जपणूक करणे, प्लॅस्टिकचा वापर न करणे, पाणी जपून वापरणे परिसरात स्वच्छता ठेवणे, शासकीय मालमत्तेचे रक्षण करणे होय, असे स्पष्ट केले.संविधाना विषयी चे मुख्य व्याख्याते विधीज्ञ अभिजित शितोळे यांनी प्रशिक्षणार्थी व उपस्थितांना संविधानातील उद्दिष्टांचा मतितार्थ समजावून सांगितला. संविधानातील सर्व प्रकरणे, महत्वाचे मुद्दे, त्यांचे लोकशाहीतील महत्व सोप्या भाषेत कथन केले. संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार, भाषण-स्वातंत्र्य, समाजाचे संरक्षण करण्यासाठी केलेले कायदे महिलांना मिळालेले अधिकार, प्रसूती रजा, कामगार कायदे, नागरिकत्व इ.विस्तृत माहिती दिली.निवेदक ए.पी.कांबळे यांनी सर्वांसोबत संविधानाचे वाचन करुन सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. |
|
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.













































































