सांगली अँटी करप्शनची कोल्हापुरात कारवाई…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

सांगली अँटी करप्शनची कोल्हापुरात कारवाई; आठ लाखाची लाच स्वीकारताना एपीआय सह कॉन्स्टेबल ताब्यात…

कोल्हापूर – जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार या दोघांना आठ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलंय.

सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं मध्यरात्री अडीच वाजता जुना राजवाडा पोलीस ठाण्यातच ही कारवाई केलीय.या घटनेमुळ कोल्हापूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अँटी करप्शन विभागाने या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे याची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर इथ दाखल करण्यात आलंय. तर पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार याला कोल्हापुरातील अँटी करप्शनच्या कार्यालयात नेण्यात आलंय. गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्थानिक गुन्हे शाखेतील दोघा जणांना दहा लाख रुपयाची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडल होत. त्यांनतर पुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यातच आठ लाख रुपयाची लाच स्वीकारताना कारवाई झाल्याने खाकीला पुन्हा डाग लागला…

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...