लोकनेते बाळासाहेब देसाई यांना बाल स्केटिंग पट्टूंनी स्मृती ज्योती ने केले अभिवादन…
कोल्हापूर : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 113 व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटिंग क्लब व शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग क्लब च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मृती दिनानिमित्त ऐतिहासिक बिंदू चौक ते पंचशील हॉटेल समोरील पुतळ्या पर्यंत स्केटिंग ज्योतीचे आयोजन करण्यात आले. या ज्योतीची सुरुवात ऐतिहासिक बिंदू चौक येथून सकाळी नऊ वाजता ॲड. शशिकांत कामत, सौ जांभळे, सौ. मुजुमदार, श्री कोरडे यांच्या हस्ते स्मृतिज्योत पूजन व प्रज्वलन करून करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने फिरून शाहू टॉकीज, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, मार्गे पंचशील हॉटेल समोरील बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्यासमोर आणण्यात आली. या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त गोंदकर यांच्या हस्ते व शिवराज देसाई, पृथ्वीराज देसाई, राजेंद्र देसाई, प्रकाश देसाई, अजित पाटील (बेनाडीकर) यांच्या हस्ते स्मृती ज्योतीस पुष्पहार घालूनअभिवादन करण्यात आले. त्यानंतर सहभागी स्केटिंग पटूंना कोल्हापूर महानगरपालिका व गोल्डन ग्रुप आणि देसाई परिवार यांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रॅलीमध्ये चार ते वीस वर्षाच्या 35 मुला- मुलीनी सहभाग घेतला होता. रॅलीचे संयोजन आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉ. महेश कदम ॲड. धनश्री कदम. राष्ट्रीय कोच भास्कर कदम. यांनी केले. रॅलीचे हे 34 वे वर्ष आहे. रॅलीतील सहभागी खेळाडूंना गोल्डन ग्रुपच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.