आबिटकर इंग्लिश मिडीयम स्कूलचा 10 वीचा १०० टक्के निकाल 

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने व शिक्षकांकडून विशेष कौतुक

गारगोटी प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत गारगोटी येथील श्री. आनंदराव आबिटकर इंग्लिश मिडीयम स्कूल ने उज्ज्वल यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली.

विद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी डवंग हिने 96.00 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक व गणित विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले. तसेच राजलक्ष्मी हुपरीकर हिने 95.00 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. याशिवाय अनिशा चव्हाण हिने 89.00 टक्के, आदिराज पाटील याने 88.80 टक्के तर रुद्र भालेकर याने ८८.४० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने आणि शिक्षकांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

केवळ मार्क मिळवणे हे आमचे उद्दिष्ट नसून, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या जिद्द आणि कष्टाला योग्य दिशा देणे हेच आमच्या यशाचे गमक असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी सांगितले. विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम माने यांनी सांगितले की, “विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहिले आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाले आहे.” या यशाबद्दल परिसरातील नागरिक आणि पालकांकडून विद्यार्थ्यांचे व शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अभिनंदन होत आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.