कोल्हापूर शहरात ‘आप’ने लावले ‘मोदी हटाव, देश बचाव’चे बॅनर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

आम आदमी पार्टीकडून ‘मोदी हटाव, देश बचाव’ मोहीम देशभर केली सुरु…

कोल्हापूर : शहरात ठिकठिकाणी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे बॅनर सकाळी पाहायला मिळाले. हे बॅनर कोणी लावले याबाबत शहरभर चर्चा सुरू झाली असतानाच आम आदमी पार्टीने पत्रकार परिषद घेऊन ‘मोदी हटाव, देश बचाव’ ही मोहीम शहरात सुरू केली असल्याचे जाहीर केले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

ज्याप्रमाणे इंग्रजांनी देशातील नागरिकांवर दडपशाही केली, त्याच पद्धतीची दडपशाही मोदी सरकार करत आहे. हिंडनबर्ग रिपोर्टने अदानी समूहाचा घोटाळा उघडकीस आणला. एल आय सी, एस बी आय या सरकारी संस्थांची, तसेच सामान्य नागरिकांची गुंतवणूक यामुळे धोक्यात आल्याने त्यावर संयुक्त संसदीय समितीने चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी संसदेत लावून धरली. परंतु गेले दोन आठवडे खुद्द सरकारी पक्षाने संसदेत गदारोळ घालून अदानी सारख्या भांडवलदारांना वाचवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला.

गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारच्या कारकिर्दीत काही मोजक्या भांडवलदारांची 8 लाख कोटींची कर्जे माफ करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते, परंतु शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याबाबत एका वर्षात निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन देखील मोदी सरकारला त्याबाबत निर्णय घेता आलेला नाही.

 

ईडी-सीबीआय या केंद्रीय तापस यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरात अनेक पत्रकारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा यासारख्या कायद्यांचा गैरवापर करून तुरुंगात टाकले जात आहे. महागाई, बेरोजगारीने सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मोदी सरकारला केंद्राच्या सत्तेतून पायउतार केल्याखेरीज पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीने देशभरात ‘मोदी हटाव, देश बचाव’ ही मोहीम देशभर सुरू केली आहे. शहरात लागलेले बॅनर आम आदमी पार्टीने लावले आहेत. ही मोहीम म्हणजे केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात फुंकलेले रणशिंग आहे. देशाला आता शिकलेला पंतप्रधान अपेक्षित आहे. या मोहिमेला देशभरातुन पाठिंबा मिळत असल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

ही मोहीम सुरूच राहणार असून जिल्हाभर आणखी बॅनर-पोस्टर लावले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजीत कांबळे, दुष्यंत माने, समीर लतीफ, अमरसिंह दळवी, लाला बिरजे, भाग्यवंत डाफळे, संजय नलवडे, प्रथमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.