विनायक जितकर
गोकुळ दूध संघाच्या वतीने चेअरमन विश्वासराव पाटील यांच्या हस्ते ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात औषधी वनस्पतीचे वृक्षारोपन…
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दूध संघाच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात औषधी वनस्पतीचे वृक्षारोपन कार्यक्रम गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडला.
याप्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील म्हणाले आमदार हसन मुश्रीफ यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयुर्वेदिक ७० वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले. गोकुळ आपल्या कार्यक्षेत्रातील जनावरांसाठी आयुर्वेदिक उपचार सेवा अत्यंत प्रभावीपणे राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण ही काळाची गरज आहे’. प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या आयुर्वेदिक वनस्पतीचे लागवड करावी. कोरफड, आडूळसा, शतावरी, हळद, तुळस, गुळवेल, हाडजोड, शेवगा, कढीपत्ता, कडुलिंब, लिंबू, लाजाळू, जांभळ, फणस, कडुलिंब, कदंब, इ वनस्पतींचे वृक्षारोपण केले असून सदरच्या वनस्पतीची वापर प्रामुख्याने जनावरांच्या मस्टायसिस व इतर आजार ताप, डायरिया, अपचन, विषबाधा, लाळ खुरकत बरे करण्यासाठी केला जातो. या वाढदिवसाचे औचित्य साधून दूध उत्पादक शेतकर्यांनी औषधी वनस्पतींची लागवड करावी व जनावरांच्या आरोग्य चांगले राखण्यासाठी जास्तीत जास्त आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करावा असे आवाहन चेअरमन विश्वासराव पाटील यांनी केले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, संभाजी पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्यवस्थापक यु.व्ही. मोगले, सहा. व्यवस्थापक संकलन बी. आर. पाटील, सहा. व्यवस्थापक डॉ. पी. जे. साळुंके, सहा. व्यवस्थापक डॉ. प्रकाश दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व कर्मचारी उपस्थित होते.