कोल्हापूर शहरातही ‘मोदी हटाव, देश बचाव’ चे लागले फलक
कोल्हापूर-दिल्ली पाठोपाठ आता कोल्हापूर शहरातही आज सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे फलक लागल्याने, राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांनी या फलकांचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने हा अधिक चर्चेचा विषय बनला.
दरम्यान, हे फलक कोणी लावले याबाबत चर्चा दुपारपर्यंत रंगली हाेती. त्यामुळे, दिल्लीत ‘आप’ने लावलेल्या फलका प्रमाणे हे फलक असल्याने येथील ‘आप’ वर बाेट दाखविण्यात आले.त्यामुळे संपूर्ण काेल्हापूर शहरात या फलकांची नेमकी जबाबदारी काेण घेणारा हा विषय उत्सुकतेचा बनला हाेता.
मोदी सरकार विरोधात विरोधी पक्ष एकवटत असतानाच गेल्या एकदोन आठवड्यापुर्वी दिल्ली शहरात आप ने ‘ मोदी हटाओ देश बचाओचे ‘ हजारो फलक लावल्याने खळबळ उडाली होती. असाच प्रकार आज कोल्हापूर शहरात दिसले. शहर परिसरात,रातोरात हे फलक लागले हाेते. रंकाळा टॉवर,माऊली चौक,तलवार चौक,हाॅकी स्टेडियम आदी चौकात हे फलक लागले आहेत.
देशात राष्ट्रीय पातळीवरील घडामोडी,उद्योगपती अडाणी समूहाच्या घोटाळ्यामुळे संसदेत सुरू असलेला गदारोळ,काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी तडकाफडकीने रद्द केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अशा आशयाचे बॅनर कोल्हापुरात लागल्याने खळबळ उडाली आहे. मात्र याचा गुरुवारी सायंकाळी खुलासा करण्यात आला. येथील आपने याबाबतचा हा खुलासा केला.
शहरात ‘आप’ने लावले ‘मोदी हटाव, देश बचाव’चे बॅनर
शहरात ठिकठिकाणी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे बॅनर सकाळी पाहायला मिळाले. हे बॅनर कोणी लावले याबाबत शहरभर चर्चा सुरू झाली असतानाच आम आदमी पार्टीने पत्रकार परिषद घेऊन ‘मोदी हटाव, देश बचाव’ ही मोहीम शहरात सुरू केली असल्याचे जाहीर केले.
ज्याप्रमाणे इंग्रजांनी देशातील नागरिकांवर दडपशाही केली, त्याच पद्धतीची दडपशाही मोदी सरकार करत आहे.
मोदी अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणार ! |
हिंडनबर्ग रिपोर्टने अदानी समूहाचा घोटाळा उघडकीस आणला. एल आय सी, एस बी आय या सरकारी संस्थांची, तसेच सामान्य नागरिकांची गुंतवणूक यामुळे धोक्यात आल्याने त्यावर संयुक्त संसदीय समितीने चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी संसदेत लावून धरली. परंतु गेले दोन आठवडे खुद्द सरकारी पक्षाने संसदेत गदारोळ घालून अदानी सारख्या भांडवलदारांना वाचवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला.
गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारच्या कारकिर्दीत काही मोजक्या भांडवलदारांची 8 लाख कोटींची कर्जे माफ करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते, परंतु शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याबाबत एका वर्षात निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन देखील मोदी सरकारला त्याबाबत निर्णय घेता आलेला नाही.
ईडी-सीबीआय या केंद्रीय तापस यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरात अनेक पत्रकारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा यासारख्या कायद्यांचा गैरवापर करून तुरुंगात टाकले जात आहे. महागाई, बेरोजगारीने सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.
VIDIO पहाः— https://youtu.be/kQso3IbqgEQ
यावेळी निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजीत कांबळे, दुष्यंत माने, समीर लतीफ, अमरसिंह दळवी, लाला बिरजे, भाग्यवंत डाफळे, संजय नलवडे, प्रथमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
शुक्रवारी 31 मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत काँग्रेस नेत्यांच्याही पत्रकार परिषदा मोदी अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणार ! मुंबई,- मोदी-अदानीची भ्रष्ट युतीने देशाच्या लोकशाही व संविधानावर घाला घातला असून सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून हुकूमशाही कारभार सुरु आहे. अदानीच्या उद्योगात २० हजार कोटी रुपये कुठून आले? राहुल गांधी हाच मुद्दा घेऊन मोदी सरकारला जाब विचारत आहेत. काँग्रेस पक्षाने मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करण्यासाठी २९ तारखेला देशभर पत्रकार परिषदा घेतल्या आणि उद्या दिनांक ३१ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाणे येथे, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात अहमदनगर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण परभणी तर पृथ्वीराज चव्हाण पुणे शहरात पत्रकार परिषदांना संबोधित करतील. माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष, मुख्य प्रवक्ते, प्रवक्ते, आमदार, खासदार व प्रमुख नेते राज्यातील इतर जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करतील. अदानी सुमहात २० हजार कोटी रुपये कुठुन आले? याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करावी ही मुख्य मागणी आहे पण मोदी सरकार या चौकशीला घाबरत आहे. मोदी सरकारला थेट जाब विचारणाऱ्या राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करुन सरकारी घर खाली करण्याची नोटीसही मोदी सरकारने बजावली आहे. या हुकुमशाहीचा पर्दापाश या पत्रकार परिषदेत केला जाईल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द… |