पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
अखेर राधानगरीकराच्यां लढ्याला यश
प्रादेशिक वन विभागाने ऐकलं
राधानगरी :विजय बकरे
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
राधानगरी परिसर वनहक्क संवर्धन समितीने राधानगरी इथले प्रादेशिक वनविभागाचे कार्यालय अन्यत्र हलवू नये यासाठी गेली सहामहिने निवेदन,बैठका घेऊन यासंदर्भात आवाज उठवला होता.स्थलांतरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर तीन जानेवारी रोजी कार्यालयास टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.आज उपवनसंरक्षक जी गुरूप्रसाद यांनी राधानगरी प्रादेशिक कार्यालयात धाव घेत आंदोलकांबरोबर सकारात्मक चर्चा केली.यावेळी आंदोलकांनी या कार्यालयाच्या ठिकाणी साडेसात गुंठे जागा आहे.नवीन कार्यालयाला ही जागा पुरेशी असल्याचं दाखवून दिलं.जी गुरुप्रसाद यांनी आंदोलकांसह जागेची पाहणी करत ही जागा कार्यालयासाठी पुरेशी आहे पण कर्मचारी निवासस्थानासाठी अपुरी असल्याचं सांगत जुनी इमारत पाडून याचं ठिकाणी नवीन इमारत बांधणार असल्याचं सांगत कार्यालय स्थलांतरनाच्या विषयाला पूर्णविराम दिला.
Loading ...
.यावेळी कृती समितीचे निमंत्रक प्रा, पी एस पाटील, सुहास निंबाळकर,बिद्री कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे,रमेश पाटील बचाटे,विक्रम पालकर,रमेश राणे,विजय महाडिक,दीपक शेट्टी,संतोष पाटील,तानाजी चौगले,विश्वास राऊत,बशीर राऊत, यांच्यासह राधानगरी परिसरातील आठ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.