गोकाक मधील प्रसिद्ध व्यावसायिकाचा खुन; गुन्हा उघड; २ गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त; तिघा आरोपींना अटक
कोल्हापूर : तीन आरोपींना ताब्यात घेऊन २ गावठी बनावटीचे पिस्तुल व इतर साहित्य असा एकूण १,१५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यातील एका अटक आरोपी कडून गोकाक मधील व्यावसायिकाच्या खुनाचा गुन्हा उघडकिस आणण्यात आला आहे, ही कारवाई कोल्हापूरने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.
पोलीस अधीक्षक, शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इसमांना शोधून काढून त्यांचेकडील हत्यारे व दारूगोळा जप्त करून सदर इसमांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले हाेते. त्यानुसार कारवाई करताना, पिस्तुुलांसह थेट खुनी गुन्हेगारच जाळ्यात सापडला.
तपास पथकातील पोलीस अंमलदार दिपक घोरपडे यांना माहिती मिळाली की, रोहीतराज भोसले, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर याचेकडे बेकायदेशिर गावठी बनावटीचे पिस्टल असून तो त्याचे कडील गावठी बनावटीची पिस्टल विक्री करणे करीता दि. ११ फेब्रुवारी रोजी आंबेवाडी ते वडणगे जाणारे रोडवर वडणगे, ता. करवीर येथे रोहीतराज भोसले याचे शेळी पालन फार्म समोर येणार आहे. अशा मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचुन ०१) रोहीतराज लक्ष्मण भोसले, व.व. २५, रा. अंतरंग हॉस्पीटल जवळ, नागाळा पार्क, कोल्हापूर व ०२ ) अरबाज सिकंदर मुल्ला, व. व. २५, रा. जाधव भवनजवळ, आंबेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांना त्यांचे कब्जातील ५०,०००/- रूपये किंमतीचे गावठी बनावटीचे ०१ पिस्टल मिळाले. त्यानंतर मुख्य आरोपी रोहीतराज भोसले याचेकडे सखोल तपास केला असता त्याने यापुर्वी डॉ. सचिन शिरगांवी, रा. गोकाक, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक यास विकलेले गावठी बनावटीचे पिस्टल हे ०३) शफात इर्शादअहंमद तरासगर, व. व. २४, रा. लकड गल्ली मोहल्ला, गोकाक, ता. गोकाक, जि. बेळगांव यास सापळा रचुन ताब्यात घेवून त्याचेकडून ०१ गावठी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे. अशी एकूण ०२ गावठी बनावटीची पिस्टल व ०३ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १,१५,०००/- रुपये किंमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीकडे तपास करीत असताना आरोपी नामे शफात तरासगर याने गोकाक मधील एक प्रतिष्ठित व्यवसायीक नामे राजेश सत्यनारायण झवर, वय ५३ वर्षे, रा. गोकाक, बेळगावी यांचा डॉ. सचिन शिरगांवी याचे सांगणे वरुन इतर दोन साथीदारांसह मिळून दि. १० फेब्रुवारी रोजी रात्रौ २०.३० वा. चे सुमारास गोकाक येथील योगीकोडा येथे नेऊन त्याच्या छाती व पाटीवर धारदार चाकुने वार करुन त्यास ठार मारुन पुरावा नष्ट करणेचे उददेशाने प्रेत गोकाक मधील कोळवी कॅनॉल मध्ये फेकुन दिले बाबत सांगीतले वरुन त्याअनुशंगाने गोकाक पोलीस ठाणे येथुन माहिती घेतली असता सदर राजु झवंर हा इसम बेपत्ता असले बाबत पोलीस ठाणेकडुन कळविले होते. त्यानंतर घटनेबाबत गोकाक पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
आरोपीकडे कौशल्याने अधिक तपास करुन शफात इर्शाद अहंमद तरासगर याचेकडे याने त्याचे गोकाक येथील इतर दोन साथीदारांच्या मदतीने डॉ. सचिन शिरगांवी याचे सांगणेवरून गोकाक येथील एका राजू झवंर या व्यावसाईकाचा डॉ. सचिन शिरगांवी याचेशी असलेले आर्थिक व्यवहारातून खुन केला असलेची माहिती उघड झाली आहे.
पोलीस अधीक्षक, शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे तसेच पोलीस अमलदार पोलीस अंमलदार दिपक घोरपडे, हिंदुराव केसरे, रणजित कांबळे, अनिल पास्ते. संजय पडवळ, विलास किरोळकर, सोमराज पाटील, अनिल जाधव, रफिक आवळकर, सचिन गुरखे, संजय हुंबे, राजेश राठोड व सायबर पोलीस ठाणेकडील सचिन बेंडकळे, रेणुका जाधव व महादेव गुरव यांनी केली आहे.
पाेलिसांच्या कार्यकतृत्वाला सलाम…चाणाक्ष नजर नि चाैकशीचा फंडा यातूनच सापडला कर्नाटक मधील प्रकरणाचा खूनी
– B POSITIVVE WATCH