POSITIVE NEWS -GREAT श्रीकांत ; ‘जिथे कमी तिथे … वाचा काय घडल नि काय बिघडलं…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कौशल्य पणाला लावून फिडरचा ब्रेकर केला दुरूस्त…

कोल्हापूर – कौशल्य, संधी आणि मेहनतीची तयारी हेच यशाचे सुत्र असल्याचे जनमित्र श्रीकांत कदमने एका फिडरचा तांत्रिक बिघाड झालेला ब्रेकर दुरुस्त करून सिद्ध केले आहे. ‘जहाँ तुम्हारी सोच .. वहीसे हमारी सोच शुरु होती है!’ असेच बहुधा श्रीकांत आपल्या मनाशी सांगत असेल. घटना अशी घडली होती की, कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरण शिराळा उपविभागातील शिरशी ३३/११ केव्ही उपकेंद्रातील ११ केव्ही टाकवे कृषी फिडरच्या ब्रेकरचे ऑपरेटिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने फिडर बंद झाला की पुन्हा चालू होत नव्हता.

पुन्हा ब्रेकर चालू करण्यात बराच वेळ लागत होता. परिणामी विद्युत पुरवठा तितक्या वेळासाठी खंडित राहायचा. अर्थातच ग्राहकातून तक्रारीचे प्रमाण वाढले होते. देखभाल व दुरुस्तीसाठी सबंधित एजन्सीला कळविले असता तो ब्रेकर खूप जुना झाला आहे. यापूर्वी देखील दुरुस्त करण्यात आला आहे. ब्रेकर बंद-चालू होण्यासाठी आवश्यक तांत्रिक भाग नवीन बसवावा लागेल असे सांगितले. सदर कामासाठी अंदाजे साठ हजाराच्या घरात खर्च कळविला. शिरशी शाखा कार्यालयातील तंत्रज्ञ श्रीकांत कदम यांना ही बाब समजली. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असे म्हणत ऑपरेटरसोबत चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन श्रीकांतने पुढाकार घेतला आणि हा ब्रेकर खोलून पहिला.

ब्रेकर बंद करतेवेळी रॉडला जो स्ट्रोक बसतो. तो बसत नव्हता, हे श्रीकांतच्या लक्षात आले. इतरही काही तांत्रिक बिघाड होते. ते सगळे बिघाड दुरूस्ती करण्याचे काम श्रीकांतने हाती घेऊन पुर्ण केले. आता सदरील ११ केव्ही फिडर ब्रेकर मॅन्युअल व रिमोट या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे व्यवस्थित चालू वा बंद होतो आहे. श्रीकांतने घेतलेला पुढाकार अनेक धडे देताना अखंडित प्रकाश देऊन जातो. ग्रेट श्रीकांत! अशीचं प्रतिक्रिया महावितरण परिवारातून, ग्राहकांमधून प्रकट होते आहे.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.