पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त अजित पवार यांचा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध संघास सदिच्छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत ताराबाई पार्क कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाचे दुग्ध व्यवसाय विकास विभाग, मुंबई चे आयुक्त अजित पवार म्हणाले कि, गोकुळ हा महाराष्ट्रातील आदर्शवत सहकारी दूध संघ असून गोकुळने आपल्या गुणवत्तेचा जोरावर पुणे,मुंबई तसेच राज्यातील इतर शहरात व्यवसाय वृद्धिंगत केला आहे. गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजना आणि सोयी सुविधांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. पारंपारिक दुग्ध व्यवसायाला व्यवसायिक स्वरूप देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम गोकुळने केले आहे. याचा राज्यातील इतर सहकारी संस्थांनी आदर्श घ्यावा . आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
असे अजित पवार म्हणाले. राज्यात दूध संकलन, विक्रीत गोकुळ आघाडीवर असून शासनाच्या दुग्ध व्यवसाया संबंधी विविध योजना गोकुळने यशस्वीपणे राबविल्या आहे. शासनाच्या आणखीन योजनांचा गोकुळने फायदा करून घ्यावा. विदर्भात ज्याप्रमाणे दूध व्यवसाय वाढीसाठी ६ हजार कोटीचा प्रस्ताव तयार केला आहे.त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय वाढीसाठी गोकुळने पुढाकार घ्यावा. मुंबई येथील आरे डेअरीचे स्टॉल गोकुळने चालवण्यास घ्यावेत असे मनोगत व्यक्त केले. तसेच गोकुळचे काही प्रलंबित प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. |
|
आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील म्हणाले कि देशातील एकूण दूध उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. दुग्ध व्यवसाया संबंधी एन.डी.डी.बी, आर.के.व्ही.वाय.व केंद्र शासनाच्या अनेक योजना शासनमार्फत जास्तीत जास्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचतील हा प्रयत्न आपल्या दुग्धविकास विभागाच्या माध्यमातून आपल्या मार्फत व्हावा. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला एक चांगली दिशा मिळेल असे विश्वास व्यक्त केला. |
याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र शासनाचे दुग्ध व्यवसाय विकास विभाग, मुंबई चे आयुक्त अजित पवार उपस्थित गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील –चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, चेतन नरके, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटी सहा.निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,नामदेव दवडते संघाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
|
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 453