‘दिवाळी भेट’…१७२४ ग्राहकांना प्रकाशाची मिळाली नवी वाट..’प्रत्येक घरी दिवा – प्रत्येक घरी दिवाळी’  हा संकल्प

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर : महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाने १५ दिवसांपूर्वी ‘प्रत्येक घरी दिवा – प्रत्येक घरी दिवाळी’  हा संकल्प केला. दिवसरात्र परिश्रपूर्वक महावितरणने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १७२४ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देऊन दिवाळीला प्रकाशाची भेट दिली.

दिवाळी म्हणजे दीपांचा, प्रकाशाचा उत्सव ! दारी नक्षीदार रांगोळी, आकर्षक आकाशकंदील, घराच्या इमारतीवर नेत्रदीपक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, चटपटीत व मिष्टांनाची मेजवानी.अनेकजण दिवाळीला आपल्या स्वप्नांच्या नवीन घरात प्रवेश करतात.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन वीज जोडणीची मागणी करणाऱ्या अर्जदारांना तत्पर वीज जोडणी देण्याचा  संकल्प महावितरणने केला.

प्रत्येक घर प्रकाशमान व्हावे, या भूमिकेतून मुख्य अभियंता मा.श्री. परेश भागवत यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले.  अधीक्षक अभियंता अंकुर कावळे (कोल्हापूर मंडल), अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर (सांगली मंडल) यांच्या  मार्गदर्शनाखाली उर्वरित जबाबदारी सर्व विभागीय कार्यकारी अभियंता व क्षेत्रीय अधिकारी – कर्मचाऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. चोख नियोजन आखले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

ग्राहकांची प्रकाशाची दिवाळी साजरी होण्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या महावितरणच्या अभियंते व जनमित्रांनी कामास सुरूवात केली. सलग १५ दिवस अथक परिश्रमातून कोल्हापूर  जिल्ह्यात ८९० सांगली जिल्ह्यात ८३४ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देऊन प्रकाशाचे नाते जपले. अस्तित्वातील विद्युत यंत्रणेतून  कोल्हापूर जिल्ह्यात ७५५ तर सांगली जिल्ह्यात २५६ ग्राहकांना आणि नवीन विद्युत यंत्रणा उभारणी करुन कोल्हापूर जिल्ह्यात १३५ तर सांगली जिल्ह्यात ५७८ ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. महावितरणच्या तत्पर सेवेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. महावितरण मुख्यालयाकडून आवश्यक वीज मीटर तातडीने उपलब्ध करुन देण्यात आले.

‘बाबुसरां’ची दिवाळी प्रकाशमान

       कागल तालुक्यातील माद्याळ गावातील बेताची परिस्थिती असलेल्या पेशाने शिक्षक नसले तरी ‘सर’  म्हणून प्रसिध्द असलेले श्री.बाबुराव चौगले (वय ७० वर्ष) यांना श्री.संग्राम घोरपडे व श्री.प्रशांत करनुरकर दोन अभियंत्यानी स्वखर्चातून वीज जोडणी उपलब्ध करुन दिली. याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी महावितरणवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.