VIDEO पहा-अपघात हाेण्यापूर्वीच सुरक्षा बाळगा अन्यथा- सी. बी. शेंडगे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जयकुमार मोरे – (उचगांव)

आराम बसने प्रवास करताय तर नक्कीच काळजी घ्या.. सुरक्षित प्रवासासाठी आरामबसच्या मालकांकडे आग्रह धरा..आराम बसच्या मालकांनी देखिल आपली आराम बस सुरक्षित आहे? चालक निर्व्यसनी आहे का?आप्तकालीन व्यवस्था सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्या, असे आवाहन कोल्हापूर येथे झालेल्या आराम बस मालकांच्या बैठकीत महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. बी. शेडगे यांनी केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब पालखे उपस्थित होते.

समृद्धी महामार्गावर झालेल्या भिषण अपघातानंतर सध्या सर्व सुरक्षा यंत्रणा, पोलीस यंत्रणा सतर्क झालीय. आपापल्या विभागातील रस्ते व सुरक्षा तसेच अपघात होऊ नये, यासाठी जनजागृती करणे, वाहनांची काळजी मालकांनी तसेच चालकांनी घ्यावी. चालक नशा तर करत नाहीत, तो निर्व्यसनी आहे का? सर्व आराम बस सुस्थितीत आहेत का? यासंबंधी मालक, चालक यांच्याशी संवाद साधत आहेत. अपघातानंतर आता कोल्हापूर येथेही आराम बस मालकांची बैठक झाली.

बैठकीत शेंडगे यांनी आराम बस मालकांना अनेक सूचना केल्या. यामध्ये आगीची घटना लागल्यास, गाडीचा अपघात झाल्य़ास कोणती व कशी काळजी घेतली जाईल. याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. गाडी सोडताना वेळेत सोडावी. अनोळखी व्यक्तीला गाडीत घेऊ नये. एसीची तीव्रता वाढल्यास, आग लागल्यास, धूर आल्यास तसेच गाडीतून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी काय केले पाहिजे, कोणत्या साधनांचा उपयोग करावा. याच्या सूचना दिल्या. अन्यथा नियमात न वागल्यास कारवाईला सामाेरे जावे लागेल. स्वतःलाही जपा आणि दुसऱ्यांचेही जीवन जपा. असेही शेंडगे म्हणाले.

सी. बी. शेंडगे यांनी नेमके काय सांगितले. हे व्हिडीओ लिंक मध्ये क्लिक करून पहा..

https://youtu.be/qFd4iwFxnwE

 

 

जड सामानांची वाहतूक करावयाची असल्यास नियमात करा. वेगमर्यादा पाळा.. चालकांनी वाहन चालविताना व्यसन करू नये. चालक प्रशिक्षित असावा. महिला व मुले, वयोवृद्ध लोकांची काळजी घ्या. प्रथोमचार पेटी, आगप्रतिबंधक संयत्र सुस्थितीत आहे का,आपत्कालीन परिस्थिती वापरावयाचा सुरक्षा दरवाजा, खिडक्या, सुस्थितीत आहेत का याची तपासणी करा. आराम बस पूर्णरित्या सुस्थितीत आहे का याची काळजी घेऊनच मालकांनी व चालकांनी गाडी पार्किंगबाहेर काढावी. यात त्रुटी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असाही इशारा, महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. बी. शेंडगे यांनी दिला.

ही बातमी सुद्धा जास्त वाचली गेली… अनेकांनी पसंत केली. पहा काय आहे नेमकी…

व्हिडिओ पहा!…मी आडवा झालो; मलाच माझी वाटे लाज! आता जबाबदारी कोणाची.. https://positivewatch.in/i-am-a-traffic-branch-guide-giving-your-own-direction/

आता उभे करणार कोण! वाचा मनोगत सविस्तर

पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी आरामबसची कागदपत्र कालबाह्य झालेली नसावीत. वेळेत सर्व त्या परवानग्या काढलेल्या आहेत की नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले. पालखे यांनी आरामबसवर दोन चालक असावेत. दोघांनीही झोप पूर्ण झालेली आहे, का आपण व्यवस्थित आहोत का व सर्वांचे आरोग्य, सदृढ आहोत का याची काळजी घेतली पाहिजे असे सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या आरामबसच्या मालकांनीही काही शंका उपस्थिती करून त्यांचे निरासन करून घेतले. यावेळी  शेफाली, सना, काेंडुस्कर, कार्तिक, नँशनल, एम.बी. लिंक, शर्मा, पवन, उषा, तहसिलदार, डाँल्फिन, नाकाेडा, घाटगे, खुराणा, चिंतामणी, लँबँक, श्री साईसह अनेक खासगी आराम बसचे  मालक प्रतिनिधी उपस्थित होते.

https://www.youtube.com/watch?v=NwedwI4wnOw

एकच ड्रायव्हर सतत गाडी चालवून डाेळे फाेडून घेणार का?

आता करिअर होणार तर RCC मध्येच

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.