जयकुमार मोरे – (उचगांव)
आराम बसने प्रवास करताय तर नक्कीच काळजी घ्या.. सुरक्षित प्रवासासाठी आरामबसच्या मालकांकडे आग्रह धरा..आराम बसच्या मालकांनी देखिल आपली आराम बस सुरक्षित आहे? चालक निर्व्यसनी आहे का?आप्तकालीन व्यवस्था सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्या, असे आवाहन कोल्हापूर येथे झालेल्या आराम बस मालकांच्या बैठकीत महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. बी. शेडगे यांनी केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब पालखे उपस्थित होते.
जड सामानांची वाहतूक करावयाची असल्यास नियमात करा. वेगमर्यादा पाळा.. चालकांनी वाहन चालविताना व्यसन करू नये. चालक प्रशिक्षित असावा. महिला व मुले, वयोवृद्ध लोकांची काळजी घ्या. प्रथोमचार पेटी, आगप्रतिबंधक संयत्र सुस्थितीत आहे का,आपत्कालीन परिस्थिती वापरावयाचा सुरक्षा दरवाजा, खिडक्या, सुस्थितीत आहेत का याची तपासणी करा. आराम बस पूर्णरित्या सुस्थितीत आहे का याची काळजी घेऊनच मालकांनी व चालकांनी गाडी पार्किंगबाहेर काढावी. यात त्रुटी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असाही इशारा, महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. बी. शेंडगे यांनी दिला.
ही बातमी सुद्धा जास्त वाचली गेली… अनेकांनी पसंत केली. पहा काय आहे नेमकी… व्हिडिओ पहा!…मी आडवा झालो; मलाच माझी वाटे लाज! आता जबाबदारी कोणाची.. https://positivewatch.in/i-am-a-traffic-branch-guide-giving-your-own-direction/ आता उभे करणार कोण! वाचा मनोगत सविस्तर |
![]() |
पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी आरामबसची कागदपत्र कालबाह्य झालेली नसावीत. वेळेत सर्व त्या परवानग्या काढलेल्या आहेत की नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले. पालखे यांनी आरामबसवर दोन चालक असावेत. दोघांनीही झोप पूर्ण झालेली आहे, का आपण व्यवस्थित आहोत का व सर्वांचे आरोग्य, सदृढ आहोत का याची काळजी घेतली पाहिजे असे सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या आरामबसच्या मालकांनीही काही शंका उपस्थिती करून त्यांचे निरासन करून घेतले. यावेळी शेफाली, सना, काेंडुस्कर, कार्तिक, नँशनल, एम.बी. लिंक, शर्मा, पवन, उषा, तहसिलदार, डाँल्फिन, नाकाेडा, घाटगे, खुराणा, चिंतामणी, लँबँक, श्री साईसह अनेक खासगी आराम बसचे मालक प्रतिनिधी उपस्थित होते.
https://www.youtube.com/watch?v=NwedwI4wnOw एकच ड्रायव्हर सतत गाडी चालवून डाेळे फाेडून घेणार का? |
![]() |