विनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी महापालिकेची कारवाई; ६ दुकाने सील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर-TEAM WATCH : कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत व्यवसाय परवान्याशिवाय व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर तसेच घरफाळा थकबाकीदारांवर महापालिकेने कारवाई केली. बिंदू चौक ते शाहू टॉकीज रोडवरील सहा दुकानांचे व्यवसाय सील करण्यात आले. या कारवाईदरम्यान घरफाळा व इतर थकबाकीपोटी २ लाख २४ हजार २६५ रुपये वसूल करण्यात आले.  महापालिकेच्या परवाना विभाग, घरफाळा विभाग, पाणीपुरवठा विभाग, विभागीय कार्यालय क्रमांक २ (छत्रपती शिवाजी मार्केट) आणि उपद्रव शोध पथकाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.

यापूर्वी बिंदू चौक ते शाहू टॉकीज परिसरातील दुकानदार आणि रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, व्यवसाय परवाना न घेता तसेच परवाना मिळविण्यासाठी आवश्यक अर्ज दाखल न करता व्यवसाय सुरू ठेवल्याने आयुष मोबाईल, शिवम मोबाईल, एस मोबाईल, नसिम मुजावर, फॅशन कॉर्नर आणि महालक्ष्मी एंटरप्रायझेस या सहा व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करून ती सील करण्यात आली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

दरम्यान, महापालिकेजवळील बाजार गेट ते पापाची तिकटी रोडवरील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या ७० व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या. तसेच भाडेकरूंसाठी २९ नोटिसा, तर घरफाळ्याची थकबाकी असलेल्या १३ मिळकतधारकांना थकबाकी भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या.विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांना नवीन व्यवसाय परवाना काढण्याबाबत यापूर्वीच नोटिसा देण्यात आल्या आहेत. घरफाळा थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. विनापरवाना व्यवसाय आणि घरफाळा थकबाकीप्रकरणी यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नियंत्रणाखाली, उपआयुक्त किरण कुमार धनवाडे आणि सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये परवाना अधीक्षक अशोक यादव, उपद्रव शोध पथकाचे प्रमुख नवीन पाटील, परवाना निरीक्षक संदीप भोई, शिवाजी कोकरे, वरिष्ठ कर सहायक सचिन इंगवले, विश्वास पाटील, भोलानाथ पाटणकर, विनोद रुईकर तसेच घरफाळा विभाग आणि विभागीय कार्यालय क्रमांक २ मधील कर्मचारी सहभागी झाले होते.महापालिका क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांनी नियमानुसार व्यवसाय परवाना घेऊनच व्यवसाय करावा. तसेच घरफाळा आणि इतर महापालिका करांची थकबाकी वेळेत भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.