रेशनकार्डधारकांना सणासुदीला जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात देण्याची मागणी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन सुधार’ मोहीम काही काळ स्थगित करा

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर – TEAM WATCH  महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती, रेशन वितरण व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी आणि रास्त भाव धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा विचार करून ‘मिशन सुधार’ मोहीम काही कालावधीसाठी स्थगित ठेवावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व रॉकेल परवानाधारक महासंघाच्या वतीने करण्यात आली.

महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने उपस्थित होते.महासंघाने दिलेल्या निवेदनानुसार, ‘मिशन सुधार’ मोहिमेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची नावे कमी झाल्याने अनेक पात्र कुटुंबे सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीचा विचार करून ही मोहीम काही काळ स्थगित ठेवावी. तसेच विशेष मोहीम राबवून पात्र नवीन लाभार्थ्यांची नावे पुन्हा समाविष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तूंची मागणी

आगामी दसरा व दिवाळी या राष्ट्रीय सणांच्या पार्श्वभूमीवर रेशनकार्डधारकांना तेल, डाळ, साखर, मीठ आणि ज्वारी या पाच जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात महागाईचा वाढता परिणाम सर्वसामान्य कुटुंबांवर होत असल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत या वस्तू उपलब्ध झाल्यास गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा मिळू शकतो, असे महासंघाचे म्हणणे आहे.

POS मशीनच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

रेशन धान्य वितरणासाठी वापरण्यात येणाऱ्या POS मशीनमध्ये सर्व्हर डाऊन तसेच अन्य तांत्रिक अडचणी वारंवार निर्माण होत असल्याने दुकानदार आणि लाभार्थी दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे POS प्रणालीतील तांत्रिक समस्या तातडीने दूर करून वितरण प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय FPS लॉगिनच्या माध्यमातून शुभ्र व उर्वरित केशरी कार्डधारकांचे ऑनलाइन रेशनकार्ड क्रमांक काढण्यासाठी रास्त भाव धान्य दुकानदारांना आवश्यक लॉगिन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही महासंघाने केली आहे. लाभार्थ्यांची माहिती तपासणे व वितरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही सुविधा आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जुलै ते सप्टेंबरचे मार्जिन मनी तातडीने देण्याची मागणी

रास्त भाव धान्य दुकानांमार्फत धान्य वितरण करणाऱ्या दुकानदारांचे जुलै २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील मार्जिन मनी लवकरात लवकर अदा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. वितरणाचे काम नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी दुकानदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रलंबित मार्जिन तातडीने देणे आवश्यक असल्याचे महासंघाने स्पष्ट केले.
दुकानदार व सेल्समनना ESI वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी

रेशन धान्य दुकानदार आणि त्यांच्या दुकानांमध्ये कार्यरत असलेल्या सेल्समनना ESI अर्थात सरकारी विमा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे काम तळागाळापर्यंत पोहोचविणाऱ्या दुकानदार व कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेचा विचार करून त्यांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे महासंघाने नमूद केले.
दुष्काळी परिस्थिती, लाभार्थ्यांच्या संख्येतील बदल, तांत्रिक अडचणी आणि दुकानदारांचे प्रलंबित आर्थिक प्रश्न यांचा एकत्रित विचार करून शासन व प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा महासंघाने व्यक्त केली आहे.

रेशन धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्र मोरे, शहराध्यक्ष राजेश मंडलिक, उपाध्यक्ष गजानन हवालदार, श्रीपती पाटील, आनंदा लादे, व संदीप लाटकर,

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.