संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना ‘मारुतीराव जाधव जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

तळाशी येथे २९ सप्टेंबरला पुरस्कार वितरण; पालकमंत्री प्रकाश आबिटकर व नामदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती…

तुरंबे प्रतिनिधी (विनायक जितकर) – संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. डॉ. सदानंद मोरे यांना यंदाचा ‘मारुतीराव जाधव (तळाशीकर गुरूजी) जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या संत साहित्य, सामाजिक विचार आणि वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तळाशी (ता. राधानगरी) येथे २९ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर व नामदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांनी दिली.

‘मारुतीराव जाधव (तळाशीकर गुरूजी) जीवनगौरव पुरस्कार’चे हे दुसरे वर्ष आहे. समाजप्रबोधन, अध्यात्म आणि कीर्तन परंपरेत उल्लेखनीय योगदान देणारे प्रसिद्ध कीर्तनकार शामसुंदर महाराज सोन्नर यांना पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. डॉ. सदानंद मोरे यांनी संत साहित्याच्या अभ्यासातून महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेचे विविध पैलू समाजासमोर मांडले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा अभ्यास, लेखन आणि प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते. त्यामुळे यंदाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा ठरणार आहे. यावेळी माजी खासदार संजयदादा मंडलिक, डॉ. नंदकुमार मोरे, संपत देसाई, पत्रकार सचिन परब आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या सोहळ्यात वारकरी संप्रदाय, तळाशी पंचक्रोशी तसेच विविध भजनी मंडळांचा सहभाग राहणार असून, संत साहित्य, अध्यात्म आणि वारकरी परंपरेचा जागर या निमित्ताने घडणार आहे. मारुतीराव जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच संतपरंपरेचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा हा सोहळा ठरणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास संत साहित्यप्रेमी, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.