कामगारांना वैद्यकीय सेवा देण्यात कुचराई झाल्यास कडक कारवाई करणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

राज्यातील सर्व इएसआयएस रुग्णालयांना दर्जेदार सुविधा देणार

कोल्हापूर – जिल्ह्यातील कामगारांसाठीचे सेवा दवाखाने व इएसआयएस रुग्णालयांमध्ये औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा मिळवून द्याव्यात, या कामी कुचराई करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

वैद्यकीय विभागाच्या महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, मुंबई (ईएसआयएस) अंतर्गत मॅक येथील सेवा दवाखान्याबाबत (इएसआयएस) आढावा बैठक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकणंगले (मॅक) येथे पार पडली. यावेळी माजी आमदार जयश्री जाधव, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी मुंबईचे संचालक अशोक थोरात, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकणंगले (मॅक) चे अध्यक्ष मोहन कुशिरे, गोशिमाचे अध्यक्ष सुनील शेळके, स्मॅक चे अध्यक्ष जयदीप चौगुले, केईएचे अध्यक्ष कमलकांत कुलकर्णी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, वैद्यकीय प्रशासन अधिकारी निर्मलकुमार नेमाणे, ईएसआयसीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिल कुमार व डॉ. रवींद्र पवार, कोल्हापूरचे सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे, इचलकरंजीच्या सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे, मॅकचे सचिव शंतनू गायकवाड तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी राज्य विमा योजनेच्या लोकल कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात काम करणारा प्रत्येक कामगार आणि त्याच्या कुटुंबीयांना राज्य कामगार विमा सोसायटी (ईएसआयएस) च्या सेवा दवाखान्यातून चांगल्यात चांगल्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणे आवश्यक आहे. या दृष्टीने गणेशोत्सवानंतर या विभागाशी संबंधित केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. 

राज्यातील प्रत्येक ईएसआयएस रुग्णालयाचे काम चांगल्यात चांगले व्हावे, तसेच याठिकाणी अत्याधुनिक सेवा कार्यान्वित होण्यासाठी तसेच रुग्णालयांमधून होणाऱ्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठीचे अर्थसाहाय्य वाढवण्यासाठी ही प्रयत्न करण्यात येत आहेत. तथापि सध्या उपलब्ध असलेल्या सेवाही दर्जेदार पद्धतीनेच द्याव्यात. यात कोणतीही चूक होऊ नये. यासाठी या विभागाच्या वरिष्ठांनीही लक्ष द्यावे, रुग्णालयांची वेळोवेळी तपासणी करावी. या रुग्णालयांमधून कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा. तसेच कामगारांच्या आरोग्याशी संबंधित सर्व सेवा सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करुन द्याव्यात. या रुग्णालयामधून उपचार घेणाऱ्या विमाधारक रुग्णांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. कामगारांना वैद्यकीय सेवा देण्यात हलगर्जीपणा होता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सेवा दवाखाने व ईएसआयएस रुग्णालयामध्ये उपलब्ध मनुष्यबळ व वैद्यकीय उपकरणे, सेवा सुविधा, रुग्णसंख्या यांची माहिती पालकमंत्री श्री आबिटकर यांनी ईएसआयएस, कामगार विभागाचे अधिकारी व कामगार प्रतिनिधींकडून घेतली. मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे यांनी प्रास्ताविक केले. केईएचे अध्यक्ष कमलकांत कुलकर्णी यांनी कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा सुचवल्या. हॉस्पिटलमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असून पुरेसे वैद्यकीय तज्ज्ञ नियुक्त करावेत, रक्तसाठा असावा, अद्ययावत वैद्यकीय साधन सामग्री ठेवावी. चांगल्या पद्धतीने सुविधा मिळाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.