राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेत (State Level Skill Competition) प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
कोल्हापूर – Bank of India स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात महिलांनी स्वबळावर उभे राहून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन महिला समुपदेशक स्मिता पवार यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला बँक ऑफ इंडिया कोल्हापूर झोनचे झोनल मॅनेजर पुनीत द्विवेदी, डेप्युटी झोनल मॅनेजर विशाल कुमार सिंह, कोल्हापूरचे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर मंगेश पवार तसेच वित्तीय समावेशन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर गोंडे उपस्थित होते.
यावेळी स्मिता पवार यांनी “महिलांची सद्यस्थिती आणि बदलती परिभाषा” या विषयावर मार्गदर्शन करत महिलांनी शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर पुढे जाण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेत (State Level Skill Competition) प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला सत्कार होय. यावेळी आरसेटीचे विविध विषयांचे प्रशिक्षक तसेच आजी-माजी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्य मोहिते यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रेयस कोरवी यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात अनिल कांबळे, राहुल पाटील आणि युवराज काशिद यांनी विशेष सहकार्य केले.

















































