महावितरणमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर – ‘राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, सावित्रीबाई फुले आदींनी महिला सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. महावितरणच्या महिला सुद्धा कमी नाहीत. वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे, वीज बील थकबाकी शुन्य करण्याचे काम महावितरणच्या रणरागिणी करत आहेत. असे मत महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी वीज बील थकबाकी शुन्य करणाऱ्या महिला कर्मचारी साताबाई जाधव, संजीवनी मेश्राम, आरती पाटील व ज्योती गोंधळी यांचा सत्कार मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
महावितरणकडून ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील डॉ. एम. विश्वेश्वरय्या मेमोरियल हॉल येथे आयोजीत जागतिक महिला दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पुनम रोकडे (पायाभूत आराखडा), कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी (प्रभारी) आप्पासाहेब पाटील, व्यवस्थापक (वित्त) स्नेहा पार्टे-सोळांकूरकर, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, व्यवस्थापक (मासं) दिपक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित महिलांची ॲस्टर आधार हॉस्पिटलमार्फत मोफत रक्तदाब, शुगर, थायरॉईडची तपासणी करण्यात आली. संतोष कसबे व अश्विनी कसबे यांनी व्यायामाचे महत्व यावर मार्गदर्शन केले. कल्याण ज्वेलर्सकडून सोन्यामधील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी लकी ड्रॉ काढून सहा बक्षिसांचेही वाटप करण्यात आले. प्रस्ताविक सविता माळी यांनी तर सुत्रसंचालन पोर्णिमा पुरोहित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयश्री कांबळे, अपर्णा शिरोडकर, स्नेहल कुंभार, श्वेता सांगलीकर व स्नेहा डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

















































