गुन्हा घडला !तिघा आरोपींना अटकपूर्व जामीन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पोक्सो अंतर्गत तसेच बालविवाह गुन्ह्यात तिघा आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

(कोल्हापूर /रुपेश आठवले )- दि २३ मे रोजी एक अल्पवयीन मुलीस सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. या मुलीच्या उपचारा दरम्यान सदरची मुलगी ३ महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने डॉक्टरांनी पोलिसांना सदरची माहिती दिली. त्यानंतर मुलीचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला होता.

COURT:CRIME NEWS:5 वर्षांनी जामीन; कोल्हापूर,बहुचर्चित मोक्कामधील आरोपी सुटले

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

वरील बातमी देखील नक्की वाचा

सर्व जबाबाच्या आधारे अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या आणि संबंध ठेवनाऱ्या तिच्या पती विरोधात आणि नातेवाईकांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता ६४(१) , पोक्सो कायदा कलम ४,६ आणि बालविवाह कायदा कलम ९,१० प्रमाणे एकूण चार आरोपी विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील तिघा आरोपींनी ॲड भारत सोनुले यांचेमार्फत मे.विशेष न्यायालय कोल्हापूर यांचेकडे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या सर्व प्रकरणी वरिष्ठ वकील सतीश कुंभार यांनी विशेष मार्गदर्शन केले. सल्ला दिला.

शासन महिला अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणात आरोपीला अटकपूर्व जामीन

ही ☝️ CRIME ची बातमी देखील खूप वाचली गेली.

या जामीन अर्जाची सुनावणी दि ११ जून रोजी मे. विशेष न्यायाधीश सो कोल्हापूर यांचे कोर्टात पार पडली. यावेळी सरकारी पक्षातर्फे सदरचा जामीन अर्ज रद्द करण्यात यावा यासाठी जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता.परंतु आरोपीचे वकील ऍड भारत सोनुले यांनी केलेला युक्तीवाद आणि उच्च न्यायालयातील दिलेले न्यायनिर्णयाचे दाखले ग्राह्य मानून मे.कोर्टाने तिघा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अटी व शर्थिं सह मंजूर केला आहे.सदर कामी आरोपींचे वतीने ॲड भारत सोनुले,ॲड सतीश कुंभार , ॲड प्रिती देवर्डेकर यांनी काम पाहिले.

अजूनही समाजात अल्पशिक्षित आणि अज्ञानाच्या सावटात असणारे अनेक कुटुंबे आहेत ज्यांना कायद्याबद्दलची अपूर्ण माहिती असते. या वेळी अजानतेपणी , नकळरित्या त्यांच्या हातातून कायद्याचे उल्लघंन होते व यातून या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत असतात. परंतु घडलेली घटना ही आरोपींनी जाणुन बुजुन केलेली कृती नाही, ही काही क्वचित प्रसंगी घडलेल्या गुन्ह्यामागची वस्तूस्थिती वेगळी असू शकते.सदर गोष्टी करण्यामागे नेमका हेतू काय होता, याचे विवेचन महत्वाचे असते.सदर बाबतीत देखील मा. न्यायालयाने सर्व गोष्टीचा उचित विचार करून आदेश पारित केला आहे. नक्कीच यामुळे न्याय व्यवस्थेवरील आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

वकिलांनी युक्तीवाद असा केला… पोक्सोत अटकपूर्व जामीन मिळाला!

या बातमीतूनही ☝️न्याय मिळाल्याचे दिसून येते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.