गोकुळच्या गुणवत्तेवर मुंबईकरांचा ठाम विश्वास – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्याशी सदिच्छा भेट

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) चे नुतन चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळ यांनी बुधवार दिनांक ११ रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची सदिच्छा भेट घेऊन गोकुळ परिवाराच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व दुग्ध विकासमंत्री अतुल सावे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गोकुळ दूध संघाच्या विविध योजनांची व प्रलंबित विषयांची माहिती दिली. यावेळी गोकुळ दूध संघाच्या ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, सौरऊर्जा प्रकल्प,स्लरी प्रकल्प, वासरू संगोपन योजना, मुंबई,पुणे डेअरी विस्तार तसेच मुंबई येथील प्रलंबित भूखंडासंदर्भातील विषययावर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुंबईसारख्या महानगरात गोकुळ दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुणवत्तेच्या माध्यमातून गोकुळने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला असून हा विश्वास कायम राखून संस्था अधिक ग्राहकाभिमुख व्हावी आणि बाजारपेठेत आपले स्थान आणखी मजबूत करावे.” असे मनोगत व्यक्त केले. दुग्धविकास मंत्री मा. श्री. अतुल सावे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गोकुळसारख्या नामांकित संस्थेला प्रलंबित विषयांवर शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.”असे सांगितले तसेच यावेळी दुग्ध विकास मंत्री यांना गोकुळ भेटीचे निमंत्रण देण्यात आले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन ज्येष्ठ् संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे ,अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिषसिंह घाटगे,बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव,कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.