बौद्ध बांधवांचा उस्फुर्त प्रतिसाद;अखिल भारतीय 34 वी बौद्ध धम्म महापरिषद

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जयसिंगपूर येथे अखिल भारतीय 34 वी बौद्ध धम्म महा परिषदेस बौद्ध बांधवांचा उस्फुर्त प्रतिसाद

शिरोली (रुपेश आठवले)जयसिंगपूर तालुका शिरोळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुत संस्कार मंडळ वैशाली बुद्ध विहार येथे ही धम्म परिषद आयोजित केली होती. या धम्मपरिषद ला महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बौद्ध भिक्खू आले होते  त्यामध्ये धम्म परिषदेचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून बनते डॉक्टर उपगुप्ताजी महास्थवीर (पूर्णा परभणी सचिव अखिल भारतीय भिकू संघ शाखा महाराष्ट्र राज्य) व प्रमुख उपस्थितीमध्ये पूज्य बनते प्राध्यापक डॉक्टर यशकशपायन महास्थवीर (धम्म मार्गदर्शक वैशाली बुद्ध विहार जयसिंगपूर) प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल महास्थवीर (पाली भाषा विभाग प्रमुख मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजी नगर), पूज्य बनते प्रज्ञाशील महास्थवीर, (मा. महासचिव महाबोधी महाविहार बुद्धगया), पूज्य भदंत करुणानंद महास्थवीर द ग्रेट हॅपिनेस यूट्यूब चैनल छत्रपती संभाजी नगर), पूज्य भदंत आर आनंद महास्थवीर,( वसगडे कोल्हापूर) पूज्य भदंत संबोधी (वसगडे कोल्हापूर), पूज्य भिक्खूणी माताजी बुद्ध कन्याजी तेरी पूज्य भिक्खूणी माताजी धम्मचारीणी थेरी (सोलापूर)  उपस्थित होते. यावेळी  कार्यक्रमांमध्ये  धम्म ध्वजारोहण रमाई उपासिका संघाकडून करण्यात आले. पूज्य भिकू संघास भोजनदान करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्धांच्या पुतळ्यास फुले वाहून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार व मेणबत्ती लावून झाली. त्यानंतर महाराष्ट्रातून आलेल्या कानाकोपऱ्यातून भदंतजीचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन रमाई उपासिका संघाकडून करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना झाली .ती पाली भाषेत व मराठीत झाले प्रस्तविकेचे वाचन प्रा. कर्णिक सरांनी केले . सरांनी आपल्या वैशाली बुद्ध विहार बद्दल कोणते कोणते कामे झालेत आणि कोणते कोणते करावे लागतात ते सांगितले।

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.