हेरले येथे तवेरा गाडीने टू व्हीलर ला धडक एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
(प्रतिनिधी :रूपेश आठवले)
हातकणंगले तालुक्यातील हेरले गावभाग फाट्याजवळ हृदया हॉस्पिटल येथे सकाळी नऊच्या सुमारात राजेंद्र दत्तात्रय माने, महंमद धोंडीबा खतीब हे दोघे आपले शेतातील काम आटपून गाव फाट्याजवळ मोटरसायकल वरून रस्ता ओलांडत होते. याचवेळी, सांगली महामार्गावरून हेरले गाव भाग फाट्याजवळ कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या तवेरा MHO8 Z6850 गाडीने हेरले येथील महंमद खतीब माने यांच्या मोटरसायकल MHO9 DN 7226 यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात महंमद धोंडीबा खतीब( वय 55 वर्ष ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजेंद्र दत्तात्रय माने (वय वर्ष 59) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. अशी माहिती नागरिकांच्याकडून देण्यात आली, घटनास्थळी अशी माहिती मिळाली की तवेरा चालकाने पलायन केले आहे, मात्र, त्यावेळी शिरीष बारगीर, अफजल पठाण, आयुब पेंढारी यांनी पाठलाग करून संबंधित तवेरा चालकाला पकडले . परंतु तवेरा चालकांनी गाडीतील गज काढून मारण्याचा येथील नागरिकांना प्रयत्न केला, असे नागरिकांच्या कडून सांगण्यात आले आहे.
महंमद खतीब हे शेतमजूर असून त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा दोन मुले आहेत. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे. या घटनेचा अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.












































































