ElECTION:CONGRES सेम पॅटर्न, उमेदवारी बदला

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर शहराचा काँग्रेस पक्षाचा जाहीर झालेला उमेदवार राजेश लाटकर यांची उमेदवारी बदलण्यात आली कारण , सर्वेचे रिपोर्टमध्ये त्यांचा पराभव दिसून येऊ लागला. त्यामुळे लाटकर यांची उमेदवारी बदलून त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली.त्याच पद्धतीने सांगली विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाची ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे, तो उमेदवार बदलून काँग्रेस पक्षाचा पाठिंबा श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांना देण्यात यावा. अशी मागणी  प्रवक्ता संतोष पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

संतोष पाटील प्रवक्ता

कारण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची हॅट्रिक रोखण्याचे काम श्रीमती जयश्री वहिनीच करू शकतील असे सांगलीतील सर्वे रिपोर्ट नुसार माहिती मिळाली आहे.त्यामुळे येत्या चार तारखेला काँग्रेस पक्षाने दिलेले उमेदवारी बदलून त्या ठिकाणी श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा द्यावा.कारण जनाधार असणारा उमेदवार सांगली 282 विधानसभेत असणे गरजेचे आहे व हा जनाधार श्रीमती जयश्री मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आहे असं एकंदरीत दिसत आहे.

 श्रीमती जयश्री वहिनीच यांना काँग्रेस पक्षाने व वरिष्ठ नेत्याने विचार करून त्यांना पाठिंबा द्यावा,अन्यथा या ठिकाणी लोकसभेप्रमाणे सांगली पॅटर्नचा उदय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.