CRIME – काेल्हापुरातल्या कोकेनचा प्रवास मुंबई ते हैद्राबादपर्यंत… तपास सुरु! आता कोण सापडणार ?

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

KOLHAPUR -काेल्हापूर- काेल्हापूर येथे सापडलेल्या कोकेनचे कनेक्शन आता मुंबई ते हैद्राबाद असे लागले आहे.  या तपास मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेशषन विभागाने पुढील कारवाई करताना हैद्राबाद येथून एकाला ताब्यात घेतले आहे. ममीदी राजेंद्र शेट्टी असे त्याचे नाव असून, याआधी ताब्यात घेतलेल्या आरोपी विशाल तांबडे यांने ममीदी शेट्टी याच्याकडून कोकेने विकत घेतल्याचे सांगितले. शेट्टी व याआधी पकडलेल्या विशाल तांबडे याला न्यायालयात हजर केले असता, गुरुवार १७ आँक्टाेबर पर्यंत पाेलीस कोठडी देण्यात आली आहे. 

स्थानिक गुन्हे अन्वेषनने सध्या विधानसभेच्या पार्श्वभूनीवर तसेच पाेलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपरणे कर्तव्य बजाविताना अँक्शन मोडमध्ये येत आपल्या खबरींना अँक्टीव्ह करत आठवड्यात तीन माेठ्या व अचूक कारवाई केल्या आहेत. यात गांजा, अवैध दारू वाहतूक आणि आता कोकेनची माेठी कारवाई करताना, केवळ धरपकड न करता, मुंबई ते हैद्राबाद पर्यंत कनेक्शन देखिल स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस निरीक्षक रविंद कळमकर व त्यांच्या पथकाने यशस्वी कामगिरी केली आहे.

संशयित आरोपी निलेश जाधव

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जाधव व पोलीस पथक रवाना केले असता त्यांनी आरोपी यास हैदराबाद येथून ताब्यात घेतले. त्यामुळे कोल्हापुरच्या पथकाने हैद्राबाद येथे आपल्या कारवाईचा ठसा उमटवित ममीदी राजेंद्र शेट्टी याला ताब्यात घेतले आहे. आता शेट्टी याच्या तोंडातून कोणती माहिती उघड हाेतेय. व तपासाची दिशा कोणत्या बाजूला जाणे याकडे पाेलीस तपासाचे व सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आहे. दरम्यान  पाेलिसांच्या या कामिगरीमुळे सर्वसामान्य जनतेत समाधानाचे वातावरण असून, या अवैध धंद्याच्या तसेच अंमली पदार्थांच्या रँकेटचा शेवटपर्यंत यशस्वी तपास करून कोल्हापूरला अवैध व अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याची मागणी पुढे येत असून, काेल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग यात यशस्वी हाेतील असाही विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

आमदार प्रकाश आबिटकरांचा कामाचा धडाका

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.