प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना टपाली मतदानाची सुविधा द्यावी – मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मुख्य निवडणूक अधिकारी यांना मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया चे वतीने निवेदन…

मुंबई – मतदानादिवशी वृत्तांकन करणाऱ्या देशभरातील प्रसार माध्यमातील छायाचित्रपत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिन्टचे प्रतिनिधी, व्हिडिओ जर्नालिस्टस यांना टपाली मतदानाची सुविधा द्यावी अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. राजीव कुमार मुख्य निवडणूक अधिकारी,भारत यांना, एस चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे द्वारा मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया चे वतीने निवेदन देण्यात आले.

मतदानादिवशी बहुतांशी पत्रकार विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, प्रिन्ट माध्यम प्रतिनिधी मतदान वृत्तांकनासाठी, नेत्यांंच्या मतदान कव्हरेजसाठी जातात. अशांचे मतदान राहून जाते. आणि म्हणूनच आमची विनंती अशी की, शासकीय कर्मचारी व वयस्क मतदारांप्रमाणे अशा पत्रकारांसाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने लागू केली तर, ते मतदानापासून वंचित राहणार नाहीत. (उदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील कॕमेरामन प्रतिनिधी सिंधुदुर्गमध्ये कव्हरेजला गेल्यास इथे मतदान चुकू शकते.) आमच्या विनंतीचा व मतदानाच्या हक्काचा विचार करून अचुक निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.